Farm Laws : तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी-देशद्रोही म्हटलं, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा?; प्रियांका गांधीचा मोदींना सवाल

Priyanka Gandhi on Farm Laws farmers kin want justice priyanka gandhi vadra writes to pm modi over-lakhimpur violence
Priyanka Gandhi on Farm Laws : मोदींनी आरोपीच्या पित्याच्या मांडीला मांडी लावून बसू नये, प्रियांका गांधींचे पंतप्रधानांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वादग्रस्त कृषी कायदे मागे घएण्याची घोषणा केली. मात्र, यावरुन काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी-देशद्रोही म्हटलं, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? असा तिखट सवाल प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. प्रियांका गांधी यांनी राकेश टिकैत यांच्या भूमिकेचे समर्थन करत या सरकारची भूमिका रोज बदलत असल्याचं म्हटलं. तुमची बदलती वृत्ती आणि हेतू यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, असं देखील प्रियांका गांधी म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींवर हल्ला करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ६०० हून अधिक शेतकऱ्यांचे मृत्यू, ३५० दिवसांपेक्षा जास्त काळचा संघर्ष होता. तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांना ठेचून मारले. तुम्हाला याची पर्वा नव्हती. या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. तुम्ही त्याचं रक्षण केलं. शेतकऱ्यांचा अपमान करताना तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, बदमाश म्हटलं तसंच अजून काय काय म्हटलं. तुम्ही त्यांना आंदोलनजीवी म्हणालात, त्यांच्यावर लाठ्यांचा वापर केलात, त्यांना अटक केली, असा घणाघात प्रियांका गांधी यांनी मोदींवर केला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आता निवडणुकीतील पराभव दिसत आहे, मग अचानक तुम्हाला या देशाचे सत्य समजू लागले आहे की हा देश शेतकऱ्यांनी बनवला आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे, शेतकरी हाच या देशाचा खरा कैवारी आहे आणि शेतकऱ्यांचे हित चिरडून कोणतंही सरकार हा देश चालवू शकत नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.