घरताज्या घडामोडीFarm Laws Repealed: MSP सह शेतकऱ्यांवरील तक्रारी मागे घेण्यावर केंद्र सकारात्मक, शेतकरी...

Farm Laws Repealed: MSP सह शेतकऱ्यांवरील तक्रारी मागे घेण्यावर केंद्र सकारात्मक, शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता

Subscribe

देशातील उत्तरेकडील राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरुच ठेवलं आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंरतु शेतकरी काही मागण्यांवर ठाम आहेत. शेतकरी आता आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे केंद्र सरकार मागे घेण्याच्या तयारीत आहे. तसेच शेतमालावरील एमएसपीचा कायदा करण्यासही केंद्राने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत केंद्र सरकारची अद्याप भूमिका स्पष्ट झाली नाही. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलनाचा तीढा सोडवण्याची जबाबदारी घेतली आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये सोमवारी बैठक होणार आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनेची बंद दाराआड चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामध्ये शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे, एमएसपीवर गठीत समितीसमोर प्रस्ताव सादर करणे अशा मागण्यांवर केंद्र सरकारचे सहमत झाले आहे. तसेच लखीमपुर खेरी प्रकरणात गृह राज्य मंत्री अजय टेनी यांच्या राजीनाम्याबाबत विचार करण्यावर भर या चर्चेमध्ये देण्यात आला आहे.

- Advertisement -

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत विचार सुरु

शेतकरी आंदोलनात आतापर्यंत ७०० शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु केंद्र सरकारने अद्याप मदतीची घोषणा केली नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यावरुन विचार सुरु आहे. केंद्र सरकार मदत करणार की राज्य सरकारला मदत करण्यास सांगणार यावर विचार सुरु आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि हरयाणा सरकार मदतीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पंजाब सरकारने यापुर्वीच मृत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत घोषणा केली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आंदोलन संपवण्याच्या तयारीत

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. शेतकरी आंदोलन मागील १ वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील शेतकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणूक आहे. यापुर्वीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तीढा सोडवण्याच्या तयारीला केंद्र सरकार लागले आहे.

- Advertisement -

राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी

शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वर्षभरात टिकैत यांना पाचव्यांदा धमकीचा फोन आला आहे. त्यांच्या सुरक्षारक्षकाने पोलीस स्थानकात नंबरसह तक्रार दाखल केली आहे. पोलीस आणि गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. टिकैत यांना अनोळखी नंबरवरुन फोन करुन अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.


हेही वाचा : शिक्षकांच्या मागण्यासाठी केजरीवाल यांच्या घराबाहेर नवज्योत सिंह सिद्धू यांचे धरणे आंदोलन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -