घरट्रेंडिंगखिशात 10 रूपये आहेत का? शेतकऱ्याचा सेल्समनकडून अपमान, अर्ध्या तासात खरेदी केली...

खिशात 10 रूपये आहेत का? शेतकऱ्याचा सेल्समनकडून अपमान, अर्ध्या तासात खरेदी केली 10 लाखांची कार

Subscribe

एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. अशाच पद्धतीची चूक एका कारच्या शोरुममधील सेल्समनकडून झाली . कर्नाटकमधील तुमकुर गावातील एक शेतकरी आपल्या मित्रासमवेत कारच्या शोरुममध्ये पोहोचला. तो आपली ड्रीम कार खरेदी करण्याकरिता गेला होता मात्र, त्याचे कपडे पाहून सेल्समनने त्याचा अपमान केला. मात्र या अपमानित शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या तासात 10 लाखांची कार खरेदी केली.

खरंतर एखाद्याच्या राहणीमानावरुन त्याला हिणवू नये, असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. मात्र एखाद्याच्या पेहरावावरुन त्याच्या संपूर्ण जीवनशैलीचे अंदाज बांधले जातात हे आपण अनेकदा अनुभवत असतो. अनेकदा एखाद्याच्या पेहराववरुन किंवा वागणूकीवरून ‘तू हे करुच शकत नाही किंवा तूला हे जमेल का? असे प्रश्न कायम विचारले जातात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. अशाच पद्धतीची चूक एका कारच्या शोरुममधील सेल्समनकडून झाली . कर्नाटकमधील तुमकुर गावातील एक शेतकरी आपल्या मित्रासमवेत कारच्या शोरुममध्ये पोहोचला. तो आपली ड्रीम कार खरेदी करण्याकरिता गेला होता मात्र, त्याचे कपडे पाहून सेल्समनने त्याचा अपमान केला. मात्र या अपमानित शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या तासात 10 लाखांची कार खरेदी केली.

नेमके काय झाले ?

हा सर्व प्रकार चिक्कासांद्रा हुबलीमधील रामनपाल्याचा शेतकरी केम्पेगौडा आरएल यांच्यासोबत घडला आहे. हा शेतकरी एसयूवी (SUV) ही ड्रीम कार खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये गेला होता. त्यावेळी तेथील सेल्समनने त्यांचा पेहराव पाहून खिल्ली उडवली. दरम्यान, या शेतकऱ्याने महिंद्रा बोलेरोबाबत विचारणा केली होती. हा शेतकरी 2 दिवस अगोदर हे डील फायनल करण्यासाठी गेला होता. सुरुवातीला त्याने दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट करण्यासाठी आणि त्याचदिवशी डिलीवरी करण्यास सांगितले. मात्र,सेल्सनने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्याला 10 लाख रुपये देण्यास सांगितले. मात्र त्यानंतर त्या शेतकऱ्यावर सेल्समनने जाणूनबुजून कमेंट करत खिल्ली उडवली.

- Advertisement -

सेल्समनने खिल्ली उडवत, 10 लाख रुपये लांबच तुझ्या खिशात 10 रुपये तरी आहेत का? त्या सेल्समनला वाटले की, हा शेतकरी उगाचच आपला वेळ वाया घालवण्यासाठी इथे आला आहे. त्यानंतर तो गाडी खरेदी करण्यासाठी आल्याची खात्री झाल्यानंतर सेल्समनने शेतकऱ्याला 25 मिनिटात 10 लाख रुपये द्याल तरच आजच ह्या गाडीची डिलीवरी करणार. मात्र त्याने रोखरक्कम आणल्यानंतर या गाडीची डिलीवरी करण्यासाठी कमीत कमी 3 दिवस लागतील. त्यामुळे या शेतकऱ्याने शोरुमध्ये हंगामा केला. याबाबत या शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि घटनास्थळी पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी शेतकऱ्याची समजूत घालून त्याला घरी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर शेतकरी म्हणाला की, “मी सेल्स एक्जीक्यूटिव्ह आणि शोरुममधील अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केल्याप्रकरणी आमची लिखित माफी मागावी. आता मला तुमची गाडी नको आहे.” शेतकऱ्याने शोरुमसमोर मोठा हंगामा केला असता, त्याचा व्हिडिओ सोशलमिडियावर व्हायरल झाला.

- Advertisement -

हे ही वाचा – Video Viral: धावत्या दोन ट्रेनच्यामध्ये अडकलेल्या घोड्याने स्वतःचा वाचवला असा जीव; पाहा थरारक व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -