घरताज्या घडामोडीदिल्लीत तणाव, शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले

दिल्लीत तणाव, शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले

Subscribe

देशभरात  उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेले शेतकऱी आज राजधानीत प्रवेश करत असून ट्रॅक्टर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. राजपथावरील संचलनानंतर शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडल्याने पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

दिल्ली व हरयाणाच्या तिकरी सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह दाखल झाले आहेत. हे शेतकरी किसान मजदूर संघर्ष समितीचे आहेत. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मोर्चास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळपासूनच शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह य़ेथे धडकू लागल्याने पोलिसही सावध झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -