दु:खद, लज्जास्पद आणि चुकीचा–कृषी कायद्यावर कंगनाची प्रतिक्रिया

Kangana Ranaut controversy Complaint filed against Kangana by delhi Sikh gurudwara management committee
Kangna Ranaut: मुंबईतील शीख संघटनेकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल

गेल्या वर्षभरापासून शेतकरी ज्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत होते. अखेर केंद्र सरकारने आज ते तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. यामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच बॉलीवूड क्वीन कंगनाने मात्र या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा निर्णय दु:खद, लज्जास्पद आणि साफ चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

तसेच जर संसदेत बसलेल्या सरकारच्या जागी गल्ल्यांमध्ये बसलेले लोकं कायदे करू लागले तर हा पण एक जिहादी देश आहे. ज्या सगळ्यांना हेच हवं होतं त्या सगळ्यांचे अभिनंदन असे तिने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शेतकऱ्यांचा विरोध असलेले तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. त्यातही बॉलीवूडमधील कलाकारांनाही मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. पण शेतकऱ्यांमध्ये या निर्णयावरून दोन गट पडले आहेत. आता त्यात वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनानेही उडी घेत मोदी सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.