घरताज्या घडामोडीWrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळेपर्यंत लढू, UWWनंतर शेतकऱ्यांचा पाठिंबा

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळेपर्यंत लढू, UWWनंतर शेतकऱ्यांचा पाठिंबा

Subscribe

कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून भारतीय किसान युनियनकडून पाठिंबा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील जिल्ह्यातल्या सौरम गावात खाप महापंचायत शेतकऱ्यांकडून बोलावण्यात आली. यावेळी कुस्तीपटूंकडून होणाऱ्या विरोधावर चर्चा करण्यात आली. खाप महापंचायतीमधील भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टीकैत यांनी सांगितलं की, खापचे प्रतिनिधी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. या कार्यक्रमात यूपी, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि पंजाबमधून खाप आणि शेतकरी नेत्यांनी सहभाग घेतला आहे.

दिल्लीतल्या जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन सुरु आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते बृजभूषण शरण सिंह यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीवर कुस्तीपटू आंदोलक ठाम आहेत. यावर राकेश टिकैत म्हणाले की, कुस्तीपटू कोणत्याही जातीचे नाहीये. यांची जात तिरंगा आहे. आम्हीही विदेशात आमच्या पक्षाचा नाही तर देशाचा झेंडा फडकावतो. त्यामुळे आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळेपर्यंत लढू राहू, असं टिकैत म्हणाले.

- Advertisement -

तुम्ही तुमची पदकं गंगेत विसर्जित करू नका. त्यांना लिलावासाठी ठेवून द्या. संपूर्ण जग पुढे येऊन लिलाव थांबवण्यासाठी प्रयत्न करेल, असंही टिकैत म्हणाले.

आंदोलक कुस्तीपटूंना UWWचा पाठिंबा

- Advertisement -

अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत, असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) सांगितले आहे.

आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील, असं UWWम्हणाले.


हेही वाचा : International Olympic Committee: महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी IOCचं भारताला आव्हान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -