घरदेश-विदेशFarmer Protest : जय शहा यांना जितके क्रिकेट कळते, तेवढेच...; ठाकरे गटाची...

Farmer Protest : जय शहा यांना जितके क्रिकेट कळते, तेवढेच…; ठाकरे गटाची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि 23 शेतमालांवर हमीभाव देण्याचा कायदा मंजूर करावा, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार याप्रश्नी वेळकाढूपणा करीत आहे आणि मध्यस्थांकरवी शेतकरी नेत्यांना मनवण्याचा प्रयोग सुरू आहे. पीयूष गोयल, अर्जुन मुंडा वगैरे लोक मध्यस्थी करीत असतील तर त्यात काही अर्थ नाही. गोयल हे तर भांडवलदारांचे हस्तक म्हणूनच मोदी सरकारात बसले आहेत. शेतकऱ्यांच्या दुःखाशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. जय शहा यांना जितके क्रिकेट कळते, तेवढेच गोयल यांना शेतीतले कळत असावे, पण हे असे लोक शेतकऱ्यांशी चर्चा करत असतील तर, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : इंडिया आघाडीतील घटक पक्षांना शरद पवारांचे आवाहन, म्हणाले…

- Advertisement -

शेतमालास किमान हमीभाव, कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामराज्यात या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. मका, कापूस, उडीद, अरहर अशा मालास हमीभाव कायद्यात आणण्याची तयारी सरकारने दाखवली. तसा लेखी प्रस्ताव दिला, पण संयुक्त किसान मोर्चा आणि अन्य शेतकरी संघटनांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : एकत्र ठराव मंजूर करायचा अन्…; आंबेडकराचा काँग्रेससह भाजपावर निशाणा

- Advertisement -

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या जुन्याच आहेत आणि त्याच जुन्या मागण्यांसाठी ते पुनः पुन्हा आंदोलने करीत आहेत. कर्जमाफी हा मुद्दा आहेच. देशातील मोदीमित्र उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात. काही मोदीमित्र बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळून गेले, पण शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरण पत्करतोय. वीज कंपन्यांच्या खासगीकरणास शेतकऱ्यांचा विरोध आहे. यापैकी बऱ्याच कंपन्या मोदीमित्र अदानीच चालवत आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

पीक विमा योजना सार्वजनिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लागू व्हावी. साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळावे. लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची हत्या घडवणाऱ्या अजय मिश्रा टेनीला मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्याच्यावर खटला चालवावा, अशा काही मागण्या आहेत आणि त्यावर सरकार बोलायला तयार नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले; वडेट्टीवारांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -