घरदेश-विदेशFarmer Protest: पंजाब-हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा; 'बळाचा वापर हा शेवटचा...

Farmer Protest: पंजाब-हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा; ‘बळाचा वापर हा शेवटचा उपाय’, उच्च न्यायालयाने फटकारले

Subscribe

केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. पोलिसांनी कडकपणा दाखवत फतेहगड साहेबापासून शंभू सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांच्या जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Farmers Protest: केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. पोलिसांनी कडकपणा दाखवत फतेहगड साहेबापासून शंभू सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांच्या जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर तेथे गोंधळ उडाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर आधीच मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीकडे येणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Farmer Protest Strict police presence at Shambhu border Tear gas canisters were fired at the gathered crowd)

काटेरी तारांबरोबरच पोलिसांनी बॅरिकेड्स, सिमेंटचे मोठे ब्लॉक, कंटेनर आणि इतर गतिरोधकही लावले आहेत. पोलिसांनी कंट्रोल रूम बनवण्यासोबतच सिंघू सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसरावर नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी अनेकदा मॉक ड्रीलही केल्या आहेत. दिल्लीतही 12 मार्चपर्यंत कलम 144 लागू आहे. दिल्ली पोलिसांनी या सीमेवरून येण्याबाबत सूचनाही जारी केली आहे.

- Advertisement -

सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा अनिर्णित

सोमवारी रात्री उशिरापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अनिर्णित राहिली. शेतकऱ्यांची योजना अशी आहे की ते आधी दिल्लीजवळील सीमेवर जमतील आणि दुपारी 3 वाजता पुढील रणनीती ठरवतील. सरकारचे म्हणणे आहे की चर्चा सुरूच राहणार आहे, तर दुसरीकडे शेतकरीही पुढील चर्चेसाठी तयार आहेत. शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की सरकारने एमएसपीचे आश्वासन देऊन दोन वर्षे उलटली आहेत… बरेच काही करता आले असते.

अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम, लोक चिंतेत

त्याचबरोबर सिंघू सीमेवर पोलिसांच्या बॅरिकेड्समुळे सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. लोकांना कुटुंबासह लांबचा प्रवास करावा लागतो. पोलिसांच्या बॅरिकेड्समुळे गुरुग्राम ते गाझीपूरपर्यंत जामची परिस्थिती आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

हायकोर्टानं घेतली दखल

MSP कायद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा प्रशासनाने अनेक ठिकाणी रोखला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे, बळाचा वापर हा शेवटचा उपाय असावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे आणि सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवले पाहिजेत असे म्हटले आहे. सर्व पक्षांनी बसून या प्रकरणावर तोडगा काढावा. बळाचा वापर हा शेवटचा उपाय असावा.

पंजाब आणि हरियाणा सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे आणि ठराविक ठिकाणी निदर्शनाला परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या मुद्द्यावर केंद्र, पंजाब आणि हरियाणाकडून स्थिती अहवालही मागवला आहे. दिल्ली सरकारलाही पक्षकार करण्यात आले आहे. या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा: BJP Politics: राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांसोबत ‘या’ नेत्याचंही नाव चर्चेत? बैठकीत निर्णय; भाजपामध्ये धुसफूस)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -