घरदेश-विदेशFarmer Protest: शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज बैठक; आंदोलनावर तोडगा निघणार?

Farmer Protest: शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज बैठक; आंदोलनावर तोडगा निघणार?

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नविन कृषी कायद्यांविरोधा आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज बैठक होणार आहे. विज्ञान भवनात आज दुपारी दोन वाजता ही चर्चा सुरु होणार आहे. बैठकीआधी शेतकरी संघटनांनी काही अटी ठेवल्या आहेत. आजही बैठकीत शेतकरी त्यांच्या अजेंड्यावरच चर्चा करणार असल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितलं. गेले ३४ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ३५ वा दिवस आहे.

शेतकरी आंदोलनावर तोडगा करण्यासाठी सरकार आणि शेतकरी संगठनांमध्ये याआधी सहावेळी चर्चा झाली आहे. मात्र, या बैठका निष्फळ ठरल्या. दरम्यान, आज पुन्हा एकदा सरकार आणि शेतकरी संघटांमध्ये बैठक होणार आहे. मात्र, या बैठीपूर्वी शेतकऱ्यांनी चार अटी ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांची पहिली अट अशी आहे की सरकारने तीनही नवीन कृषी कायदे रद्द करावे. दुसरी अट एमएसपीची (किमान आधारभूत किंमत) कायदेशीर हमी आहे. तिसरी अट वीज बिलाच्या मसुद्यात बदल करण्याची मागणी केली आहे. चौथी अट म्हणजे पराली कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावं. असं असलं तरी सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार की आंदोलन असंच पुढे चालू राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -

ट्रॅक्टर मार्च पुढे ढकलला

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांनी बुधवारी सरकारशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रस्तावित ट्रॅक्टर मार्च गुरुवारपर्यंत तहकूब केला. यापूर्वी शेतकऱ्यांनी चर्चेच्या अजेंडा संदर्भात 26 डिसेंबर रोजी सरकारला पत्र लिहलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -