शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार

farmer protest violence Big split in farmer protest two farmer groups withdraw from agitation
शेतकरी आंदोलनातील एक फोटो

शेतकरी आंदोलनासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचे समन्वयक व्हीएम सिंग यांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय, भारतीय किसान यूनियन संघटनेने (भानू) देखील आंदोलनातून माघार घेतली आहे. प्रजासात्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या दिवशी हिंसाचार झाला. या प्रकरणी अनेक शेतकरी नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही बातमी समोर येत असतानाच आता दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे.

शेतकरी नेते व्हीएम सिंग यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची संघटना शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रीय किसान मजदूर संघ असं व्ही.एम. सिंग यांच्या संस्थेचं नाव आहे. ही संघटना यापुढे आंदोलनाचा भाग होणार नाही. व्हीएम सिंह म्हणाले की, आंदोलन अशाप्रकारे चालणार नाही. आम्ही येथे हुतात्मा करण्यासाठी किंवा लोकांना मारहाण करायला आलेलो नाही. त्यांनी भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यावर आरोप केले आहेत. व्हीएम सिंग म्हणाले की, राकेश टिकैत सरकार यांच्या भेटीला गेले होते. यूपीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी एकदा तरी उपस्थित केला का? त्यांनी एकदा तरी धानाविषयीचर्चा केली का? ते कशाबद्दल बोलत होते. आम्ही येथूनच समर्थन देत राहिलो आणि तिथे कोणीतरी नेते बनले, हा आमचा व्यवसाय नाही, असं व्हीएम सिंह म्हणाले.


हेही वाचा – शेतकरी आंदोलन: हिंसाचारप्रकरणी टीकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांविरोधात FIR दाखल