घरदेश-विदेशहिंसाचारानंतर किसान मोर्चाची आपत्कालीन बैठक; आंदोलानामुळे सरकार हादरलं अन् कट रचला

हिंसाचारानंतर किसान मोर्चाची आपत्कालीन बैठक; आंदोलानामुळे सरकार हादरलं अन् कट रचला

Subscribe

शेतकऱ्यांच्या आंदोलनाने सरकार हादरलंय म्हणून घाणेरडा कट रचण्यात आल्याचा किसान मोर्चाचा आरोप

दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दि्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारानंतर किसान मोर्चाने आपत्कालीन बैठक घेतली. शेतकरी संघटनांनी बलबीरसिंग राजेवाल यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत काल झालेल्या हिंसाचारावर चर्चा केली. यावेळी शेतकरी आंदोलनाने केंद्र सरकार चांगलंच हादरलं आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळेच किसान मजदूर संघर्ष समिती आणि इतर शेतकरी संघटनांच्या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात घाणेरडा कट रचण्यात आला, असा आरोप देखील किसान मोर्चाने केला आहे.

‘संयुक्त किसान मोर्चा’च्या आपत्कालीन बैठकीनंतर निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनानुसार ज्यांनी या आंदोलनाच्या १५ दिवसानंतर स्वतंत्र आंदोलन स्थापन केलं होतं, ते संयुक्तरित्या आंदोलन करणार्‍या संघटनांचा भाग नव्हते. जेव्हा २६ जानेवारीला शेतकरी संघटनांनी शेतकरी परेडचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा दीप सिद्धू याच्यासारख्या समाजकंटकांनी व इतर शेतकरी संघटनांनी शेतकरी आंदोलन फोल करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, या षडयंत्रांतर्गत इतर शेतकरी संघटना व इतर व्यक्तींनी रिंग रोडवर मोर्चा काढून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याची घोषणा केली. ‘किसान मजदूर संघर्ष समिती’ च्या नियोजित मोर्चाच्या दोन तास आधी त्या संघटनेने मोर्चाला सुरवात केली. शांततामय आणि सशक्त शेतकरी संघर्ष विस्कळीत करण्याचा हा कट होता. अशा परिस्थितीत ‘संयुक्त किसान मोर्चा’चे सर्व घटक या घटनेचा तीव्र निषेध करतात, असं किसान मोर्चाने म्हटलं आहे.


हेही वाचा – शेतकरी आंदोलन: हिंसाचारप्रकरणी टीकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांविरोधात FIR दाखल

- Advertisement -

शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळावर राहून शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवावं, असं निवेदनातून शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. शेतकरी संघटनांनी हे आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प केला असून शांततामय शेतकरी आंदोलनाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकार, प्रशासन आणि समाजकंटकांचा तीव्र निषेध केला. ‘संयुक्त किसान मोर्चा’ नुसार २७ जानेवारीला ३२ संघटनांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. ज्यात बलबीरसिंग राजेवाल, जगजितसिंग दलवाल आणि दर्शन पाल यांच्यासह सर्व शेतकरी नेते उपस्थित होते.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -