घरताज्या घडामोडीदेशभरात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, दिल्लीला छावणीचे रुप, महाराष्ट्रातही पडसाद

देशभरात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, दिल्लीला छावणीचे रुप, महाराष्ट्रातही पडसाद

Subscribe

शेतकऱ्यांनी देशभरात पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे काही राज्यांमध्ये वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत.

कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांनी देशभरात पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशातील अन्य राज्यात हे आंदोलन १२ ते ३ या वेळेत करण्यात येत आहे. २६ जानेवारी व त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत ज्याप्रकारे पोलीस व आंदोलकांमध्ये संघर्ष झाला तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी दिल्लीत कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून ५० हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आलं आहे.

- Advertisement -

दिल्लीसह अनेक राज्यात शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून काहीजणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी देशभरात पुकारलेल्या या चक्का जाम आंदोलनामुळे काही राज्यांमध्ये वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलनाचे पडसाद उमटत असून नाशिक, नाशिक -पुणे महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्का जाम केला आहे. तसेच चांदोरी, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. स्वाभामिनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह समन्वय समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा येथेही चक्का जामा करण्यात आला आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमकीबरोबरच धक्काबुक्की झाली. यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या रमेश आवटे, अशोक खालकर, दत्ता गायकवाड यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यादरम्यान नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली .

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -