घरदेश-विदेशFarmers Protest : आज दिल्लीत शेतकरी मोर्चा; राजधानीत पोलीस बंदोबस्त

Farmers Protest : आज दिल्लीत शेतकरी मोर्चा; राजधानीत पोलीस बंदोबस्त

Subscribe

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या सीमेवर कलम 144 लावण्यात आला आहे.

नवी दिल्ली : विविध मागण्यासाठी शेतकरी मोर्चा आज दिल्लीत धडकणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. शेतकरी हे त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. चंदीगड येथे शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत सोमवारी (12 फेब्रुवारी) बैठक झाली. पण बैठकीतून कोणताही निर्णय झाला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी सरकारला आज सकाळी 10 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.

शेतकरीसोबत झालेल्या बैठकीत एमएसपी विषयचा कायदा, कर्जमाफीच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोल करत आहेत. या सर्व मागण्या शेतकऱ्यांनी यापूर्वी केल्या होत्या. पण शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याच निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या सीमेवर कलम 144 लावण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल – विजय वडेट्टीवार

शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी सरकारने निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांच्या एकूण 11 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्कत पोलीस ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून मोर्चावर करडी नजर ठेवून आहे. हरियाणा अंबाला, फतेहाबाद आणि कुरूक्षेत्र येथे अनेक ठिकाणी शेतकरी मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग, काँक्रीट आणि लोखंडी स्पाइक टाकले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -