घरदेश-विदेशFarmer Protest: हिंसाचारानंतर चारशेहून अधिक शेतकरी बेपत्ता

Farmer Protest: हिंसाचारानंतर चारशेहून अधिक शेतकरी बेपत्ता

Subscribe

शेतकरी संघटनांचा दिल्ली पोलिसांवर संशय

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा जास्त आंदोलन करणारे शेतकरी बेपत्ता आहेत. पंजाबमधील शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांनी चारशेहून अधिक शेतकरी आणि तरुण बेपत्ता असल्याचा आरोप केला आहे. केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले दोन महिने शेतकरी दिल्लीच्या सलीमांवर शांततेत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱअयांनी ट्रॅक्टर परेड काढत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १८ शेतकर्‍यांना अटक केल्याचं सांगितलं. उर्वरित शेतकर्‍यांबाबत कोणतीही माहिती नाही, यामुळे त्यांचे कुटुंब चिंतीत आहे. शेतकरी बेपत्ता होण्यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.

पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांनी असा आरोप केला आहे की दिल्ली हिंसाचारादरम्यान ४०० हून अधिक तरूण आणि वृद्ध शेतकरी बेपत्ता आहेत. त्याचबरोबर काही संघटनांनी असा आरोपही केला आहे की बेपत्ता झालेले लोक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर अमृतसर लखरा मिशन नावाच्या संस्थेकडून या विषयाबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचा निर्णयही घेतला आहे.

- Advertisement -

बेपत्ता लोकांच्या शोधात वकीलही एकवटले

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे वकील हकाम सिंह यांनी सांगितलं की पंजाबमधील ८०-९० तरुण २६ जानेवारीला सिंघू आणि टिकरी बॉर्डर येथे गेले होते. हिंसाचारानंतर हे सर्व तरुण शेतकरी अद्याप त्यांच्या छावण्यांमध्ये परतलेले नाहीत. वकिलांचा एक गट त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी आम्ही पोलीस, शेतकरी संघटना आणि रुग्णालयांशी संपर्क साधत आहोत.


हेही वाचा – माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या आईची हत्या

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -