Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Farmers Protest: दिल्लीतील संसद भवनाजवळ आज शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन

Farmers Protest: दिल्लीतील संसद भवनाजवळ आज शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन

Related Story

- Advertisement -

शेतकरी संघटनेकडून आज दिल्लीत जंतर-मंतरवर येथे संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, ‘किसान संसद’ आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून दररोज सिंघू सीमेवरुन २०० आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर आपली हाजेरी लावणार आहेत. शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेत पार पडेल, असे दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्याने सांगितले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना अटी-शर्थींसह ही परवानगी दिली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने या आंदोलनाचे नाव ‘किसान संसद’ ठेवले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जंतर-मंतर येथे शेतकर्‍यांच्या तीन कृषी कायद्याविरूद्ध झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे. संपूर्ण परिसर छावणीत रुपांतरित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक शेतकरी सिंघू बॉर्डरवरुन बसने जंतर-मंतरवर दाखल होणार आहेत. त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करत आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी शेतकर्‍यांना निषेधासाठी कोणतीही लेखी परवानगी दिली नसून त्याला निषेध करण्यासाठी दिल्ली सरकारची औपचारिक परवानगी मिळाली आहे. या आदेशानुसार, आजपासून ९ ऑगस्टपर्यंत २०० आंदोलक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलन करू शकतात. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकर्‍यांना कोरोना नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. सध्या दिल्लीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, त्यामुळे कोठेही गर्दी होताना दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. पण शेतकरी आंदोलनासाठी दिल्ली सरकारने मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बदल करून परवानगी दिली आहे.


 

- Advertisement -