घरताज्या घडामोडीदिल्ली-नोएडा सीमा केली खुली; संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला निर्णय

दिल्ली-नोएडा सीमा केली खुली; संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला निर्णय

Subscribe

गेल्या १८ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे गेल्या १८ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.

- Advertisement -

राजनाथसिंह यांची घेतली भेट

शेतकऱ्यांच्या पाच सदस्य टीमने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असून त्यावेळी बैठकीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. यावेळी संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यातील मुख्य मागणी ‘शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे’. त्याप्रमाणे मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आल्यामुळे आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं.

मार्गावरील बॅरिकेड्स हटवले

नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स रात्री उशिरा हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. मात्र, चिल्ला सीमा बंद झाल्यामुळे वाहनचालकांना दिल्लीला जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजमधून जावे लागले.

- Advertisement -

शेतकरी संघटनेचे नेते उपोषणाला बसणार

‘आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून १४ डिसेंबर रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत’.
– कमलप्रीत पन्नू, शेतकरी नेते

आमरण उपोषण सुरू करू

‘शेतकरी राजस्थान सीमेवरुन ट्रॅक्टर मार्च काढून दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करतील. तसेच पंजाबमधून येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखलं जात आहे. शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचू द्या. सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिवसापासून आमरण उपोषण सुरू करू’. गुरनामसिंग चारुनी, – शेतकरी नेते


हेही वाचा – डॉक्टर झाल्यानंतर १० वर्ष सरकारी रुग्णालयात नोकरी सक्तीची! ‘या’ राज्याचा निर्णय!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -