आता शेतीसंबंधीत सामान मिळणार भाड्याने; Farmkart Start-Up ची नवी स्कीम घ्या जाणून

farmkart forays into agri equipment rental business launches rent4farm platform
आता शेतीसंबंधीत सामान मिळणार भाड्याने; Farmkart Start-Up ची नवी स्कीम घ्या जाणून

शेतकऱ्यांना आता शेतीसंबंधित उपकरणे Agri startup Farmkart उपलब्ध करून देणार आहे. यासाठी काल, बुधवारी rent4farm हे प्लेटफॉर्म लाँच करण्यात आले. कंपनीने एका निवेदनात सांगितले आहे की, ‘rent4farm’ शेतकऱ्यांना स्वस्त दरात चांगल्या गुणवत्तेच्या मशीन आणि उपकरण भाड्याने देण्यास मदत करेल. याची मध्य प्रदेशापासून सुरुवात होईल. याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात फार्मकार्टने १०० प्रमाणित उपकरण पुरवठादारांशी भागीदारी केली आहे आणि त्याने भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली आहे.

फार्मकार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटीदार म्हणाले की, ‘यावर्षी जूनमध्ये आम्ही ‘rent4farm’ सुरू केले होते आणि याला प्रतिसाद खूप चांगला आला. आता आम्ही व्यापक स्वरुपात सुविधेचा विस्तार करत आहे.  कमीत कमी १० हजार शेतकऱ्यांना सेवा देण्याची आमची आशा आहे. यावर्षीच्या अखेरीसपर्यंत आमची मोबाईल एप्लिकेशनद्वारे ३ हजार ५०० ठिकाणांच्या २० हजार शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. सध्या १ लाखांहून अधिक शेतकरी फार्मकार्टसोबत जोडले गेले आहेत.’

पुढे ते म्हणाले की, ‘मध्य प्रदेशातील ३ हजार ५०० गावांमध्ये फार्मकार्टचे उत्पादन आणि सेवा उपलब्ध आहेत. इतर भौगोलिक क्षेत्रांमध्ये आपली सुविधा पोहोचवण्यासाठी कंपनी सतत काम करत आहे. फार्मकार्टचे मुख्य ऑफिस मध्यप्रदेशातील बडवानी येथे आहे. तसेच याची धोरणात्मक टीम कॅनडातील टोरंटो येथे आहे.’


हेही वाचा – SBI New Scheme: स्वस्त दरात होम लोनपासून ते Fixed deposit रकमेवर ग्राहकांना मिळणार लाभ