राम मंदिर, फारूख अब्दुल्ला आणि वादास कारण…

रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत. त्यामुळे त्यांंचं मंदिर हे अयोध्येमध्येच बांधलं जावं, असा हट्ट का? असा प्रश्न जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अबदुल्ला यांनी केला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ram mandir

रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत. त्यामुळे त्यांंचं मंदिर हे अयोध्येमध्येच बांधलं जावं, असा हट्ट का? असा प्रश्न जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अबदुल्ला यांनी केला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारींच्या पुस्तक प्रकाश सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. सध्या निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराच्या मुद्यावरून भाजप, शिवसेनेसह हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना आता अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा अशी मागणी होत आहे. संयुक्त जनता दलाचे नेते पवन वर्मा यांनी प्रश्न विचारले त्याला फारूख अबदुल्ला यांनी उत्तर दिलं. ‘राम मंदिर अयोध्येमध्ये का बांधू नये? हिंदुंना अयोध्येमध्ये राम मंदिर बांधावं असं वाटत असेल तर त्यामध्ये चुकीचं काय? असा सवाल यावेळी जनता दलाचे नेते पवन वर्मा यांनी केला. त्याला उत्तर देताना, फारूख अब्दुल्ला यांना योध्येमध्येच बांधलं जावं, असा हट्ट का? असा प्रतिसवाल केला आहे. त्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

राम मंदिरासाठी आग्रह

अयोध्येमध्या राम मंदिर बांधावं यासाठी शिवसेना, संघ आणि विहिंप आग्रही आहेत. सत्तेत येताना भाजपनं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणार असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा जोरात चर्चिला जात आहे. शिवसेनेनं तर अयोध्या दौरा करत पहिले राम मंदिर फिर सरकार अशा घोषणा दिली. शिवाय राम मंदिर केव्हा बांधणार? त्याची ,तारीख देखील सांगा असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपसमोरची अडचण आणखी वाढली आहे. तसेच संघ देखील राम मंदिरासाठी आग्रही असल्यानं भाजपची गोची  झाली आहे.