घरदेश-विदेशफारूक अब्दुला म्हणाले - आता अशी वेळ आलीये की, बायकोला किसही करू...

फारूक अब्दुला म्हणाले – आता अशी वेळ आलीये की, बायकोला किसही करू शकत नाही!

Subscribe

फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हस्यकल्लोळ

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुला हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. असे असताना ते आपल्या वक्तव्यांसह हसण्या-बोलण्याच्या शैलीसाठी देखील ओळखले जातात. जम्मूमधील एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला बोलत होते तेव्हा असेच वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरू आहे. फारूक अब्दुला यांनी रविवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे उपस्थितांमध्ये एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला. कोरोनामुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण असताना फारूक अब्दुल्ला म्हणाले, ‘कोरोनाची भीती एवढी आहे की, मी माझ्या बायकोला किसही करू शकत नाही.’ दरम्यान, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मी पत्नीचं किस तर घेऊ शकलो नाही. यासह हात मिळवण्याची आणि गळाभेट घेण्याचीही भीती वाटते. लवकर हा कोरोना नष्ट व्हावा, असे वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी केले आहे.

असं म्हणाले फारूक अब्दुल्ला

फारुक अब्दुल्ला म्हणाले, ‘परिस्थितीच अशी आहे की कुणी हात मिळवताना किंवा गळाभेट घेतानाही घाबरत आहे. इतकंच काय मी माझ्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकत नाही. मनात असूनही गळाभेट घेऊ शकत नाही.’. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यावर तिथं उपस्थित असलेले सर्वच लोक पोट धरुन हसत सुटले. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याची एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मीरात 4G इंटरनेट देण्याची मागणी

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना फारुक अब्दुल्ला यांनी कोरोना लसीवरही चर्चा केली. तसेत सरकारने ज्या कोरोना लसींना मंजूरी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यासह जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रक्त गोठवणारी थंडी आहे. अशावेळी लोकांकडे 4G इंटरनेट सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर चालताना लोकांमध्ये धार्मिक सद्भाव आणि माणुसकीचे नातं टिकवण्याचं आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -