घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेश: अखेर ओलीस ठेवलेल्या २३ मुलांची सुटका; ८ तासांनंतर आरोपीचा खात्मा

उत्तर प्रदेश: अखेर ओलीस ठेवलेल्या २३ मुलांची सुटका; ८ तासांनंतर आरोपीचा खात्मा

Subscribe

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद मधील ओलीस ठेवलेल्या २३ मुलांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ८ तासांच्या या थरार नाट्यानंतर या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमला १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुटका करण्यादरम्यान झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष माथमचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या घरातून एक राफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. पाच पोलिसांसह सहा नागरिक या कारवाईत जखमी झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी या आरोपीने २००१ मध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती.

नक्की काय घडलं?

या आरोपीने मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने गावातील मुलांना घरी बोलावलं होत. त्यानंतर सर्व गावातील मुलं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरात दाखल झाली. मग या आरोपीने सर्व मुलांना एका खोलीत बंद केलं होत. गावकऱ्यांना आपली मुलं घरी परतली नाही म्हणून ते आरोपीच्या घरी गेले. त्यावेळेस संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर दगड फेक केली. यामुळे आरोपीच्या घराचा दरवाजा तुटला. यायाच फायदा घेऊन सर्व पोलिस घरात घुसले. आरोपीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी दिली. मात्र यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि बॉम्बही फेकले. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी एनएसजी कमोडोंची मदत घेतली. पुढील कारवाई एनएसजीचे पथक दाखल झाल्यानंतर करण्यात आली. त्यानंतर सर्व मुलांची सुखरुप सुटका झाली. यामुळे उत्तर प्रदेश सरकानं पोलिसांनी १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, कठोर कारवाई केली जाईल- अमित शाह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -