फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर होतोय परिणाम ; डॉक्टरांचा दावा

लंडनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, बर्गर आणि चिकन नगेट्ससह भरपूर प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने जगभरातील स्वयंप्रतिकार रोगांमध्ये वाढ होत आहे. फास्टफूड मुळे लोकांची रोगप्रतिकार शक्ती ढासळत चालली आहे.

Fast food affects the immune system; The doctor's claim
फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर होतोय परिणाम ; डॉक्टरांचा दावा

आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचीच जीवनशैली बदलत चालली आहे. आजच्या अनियमित जीवनशैलीमध्ये खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत असते. रोजचा नियमित आहार घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे अनेकजण फास्ट फूडला प्राधान्य देतात. मात्र, या फास्ट फूडच्या सेवनाने अनेक आजार झडतात हे आपण ऐकलेच असाल. मात्र, लंडनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. मिळालेल्या माहीतीनुसार, बर्गर आणि चिकन नगेट्ससह भरपूर प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने जगभरातील स्वयंप्रतिकार रोगांमध्ये वाढ होत आहे. फास्टफूड मुळे लोकांची रोगप्रतिकार शक्ती ढासळत चालली आहे.

लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचे संशोधक यावर अभ्यास करत आहेत. फास्ट फूडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. जे व्यक्तीच्या शरीरीतील मायक्रोबायोम प्रभावित करतात. मायक्रोबायोम हे आपल्या शरीरातील सूक्ष्म जीवांपैकी एक आहे. जे शरीरातील विभिन्न शारिरीक क्रियांवर नियंत्रण ठेवते. यूकेमध्ये सुमारे 4 दशलक्ष लोक स्वयंप्रतिकार रोगाने ग्रस्त आहेत. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय स्तरावर, या प्रकरणांमध्ये दरवर्षी 3 ते 9 टक्के वाढ होत आहे.

स्वयंप्रतिकार रोग

स्वयंप्रतिकार रोग शरीरातून असामान्य रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे होतो. स्वयंप्रतिकार रोगांमध्ये, शरीराची प्रतिपिंडे पेशी, ऊती आणि सामान्य पेशी नष्ट करते. असे अनेक प्रकारचे स्वयंप्रतिकार रोग आहेत ज्यात काही विशिष्ट अवयवांवर आक्रमण करतात आणि इतर काही विशिष्ट प्रकारच्या ऊतींवर हल्ला करतात.मधुमेह, संधिवात, दाहक आंत्र रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस यासारखे ऑटोइम्यून म्हणजेच, स्वयंप्रतिकर रोगाने अनेक लोक ग्रासले आहेत


हेही वाचा -Omicron Diet : कोरोनाच्या संसर्गानंतर ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश