Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश जालौनमध्ये भीषण अपघात; वऱ्हाडाच्या बसला डंपरची धडक; 5 मृत्यू,15 जखमी

जालौनमध्ये भीषण अपघात; वऱ्हाडाच्या बसला डंपरची धडक; 5 मृत्यू,15 जखमी

Subscribe

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. एका लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला एका अज्ञात वाहनाने धडक दिली, यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसचं, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. एका लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला एका अज्ञात वाहनाने धडक दिली, यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसचं, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ( Fatal accident in Jalaun gaon bus hit by dumper 5 dead 15 injured )

मिळालेल्या माहितीनुसार, एमपी 30 पी 1127 ही बस जालौन पोलीस स्टेशन हद्दीतील रामपुरा येथील दुतावली गावात लग्नाची मिरवणूक घेऊन आली होती. बस लग्नाच्या मिरवणुका घेऊन मडैला गावाकडे परत जात होती. त्याचवेळी वाटेत मधौगढ पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळपुरा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली.

- Advertisement -

वाहनाला धडक दिल्यानंतर बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. यामध्ये ५ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले, जिथे 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना झाशीला रेफर करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेले मडैला गावचे रहिवासी होते.

- Advertisement -

( हेही वाचा: देशातील गोंधळ सावरण्यास घटना अपुरी, संजय राऊत यांच्याकडून न्याययंत्रणेवर प्रश्नचिन्ह )

‘बस समोरून येणाऱ्या डंपरला धडकली, हाहाकार माजला’

प्रत्यक्षदर्शी राजेंद्र यांनी सांगितले की, वऱ्हाड परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला बसची धडक बसली. यामध्ये लोक अपघाताचे बळी ठरले. टक्कर होताच आरडाओरड झाली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लग्नाचं वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

- Advertisment -