घरदेश-विदेशआग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, ४१ जण जखमी

आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, ४१ जण जखमी

Subscribe

इटावा – आग्रा लखनऊ महामार्गावर सैफई पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ३ वाजता मोठा अपघात झाला. स्लीपर बसला मागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने पाच प्रवासी ठार तर ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा झाला. स्लीपर बसमधील जखमींना सैफई वैद्यकीय विद्यापीठाच्या आपत्कालीन रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी अवनिश कुमार राय, एसएसपी जयप्रकाश एसडीएम ज्योत्स्ना बंधू, मंडळ अधिकारी नागेंद्र चौबे, एसएचओ रमेश सिंह, पीजीआय चौकीचे प्रभारी केके यादव पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले.

- Advertisement -

पोलिसांनी मृतदेह उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात ठेवले आहेत. सर्व जखमींना उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आपत्कालीन ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना माहिती पाठवली आहे.

खासगी स्लीपर बस गोरखपूरहून अजमेरला जात होती. आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वेच्या चॅनल क्रमांक १०३-१०४ दरम्यान रविवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तीन तासांच्या प्रयत्नानंतर तीन क्रेनच्या मदतीने बस आणि ट्रक वेगळे करण्यात आले आणि त्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढता आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -