घरदेश-विदेशबांगलादेशमध्ये बसचा भीषण अपघात; १९ प्रवाशांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये बसचा भीषण अपघात; १९ प्रवाशांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये आज वेगवान बस ३० फूट दरीत कोसळून १९ जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

इमाद परिवाह कंपनीची ढाकाकडे जाणारी बस मदारीपूरमधील शिबचर येथे बंगबंधू एक्सप्रेसवेवर अनियंत्रित झाल्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मसूद आलम यांनी सांगितले. पद्मा पुलाच्या उद्घाटनानंतर एक्स्प्रेस वेवरील हा सर्वात भीषण अपघात आहे. तांत्रिक बिघाड आणि अतिवेगामुळे बसचा अपघात झाल्याचा अंदाज त्यांनी दर्शविला आहे.

- Advertisement -

मदारीपूरच्या उपायुक्त रहीमा खातून यांनी सांगितले की, घटनास्थळावरून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना शिबचार उपजिल्हा आरोग्य संकुल आणि ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करेल. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 25 हजार रुपये आणि जखमींना प्रत्येकी 5 हजार रुपये सरकारकडून दफनविधी आणि इतर खर्चासाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परवानगी न घेता बस धावत होती
बांग्लादेशमधील माध्यमातील वृत्तानुसार ही बस तीन महिन्यांपासून कोणत्याही परवानगीशिवाय धावत होती. वाहनाची फिटनेस क्लिअरन्स – ढाका मेट्रो बा-15-3348 – यावर्षी जानेवारीमध्ये कालबाह्य झाली होती. या बसकडे वैध मार्ग परमिट आणि टॅक्स टोकन असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या अपघातामागे अतिवेग हे कारण असल्याचा संशय महामार्ग पोलिसांना आहे.

- Advertisement -

खराब वाहने, खराब रस्त्यांमुळे अपघात
शोनाडांगा बस काउंटरचे काउंटर मॅन एमडी सबुज खान यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, इमाद परिवहन बस 43 हून अधिक प्रवाशांना घेऊन ढाक्याच्या दिशेने प्रवास करत होती. बांगलादेशमध्ये जुनी, खराब देखभाल केलेली वाहने आणि रस्ताच्या दुर्दशेमुळे रस्ते अपघातात वाढ झाली आहे. तसेच दक्षिण आशियातील बांग्लादेश हा सर्वात वाईट रस्ते अपघाताचा विक्रम असलेल्या देशांपैकी एक आहे.

गेल्या वर्षी विक्रमी 9,951 लोकांचा मृत्यू
बांगलादेशी पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या मते, गेल्या वर्षी रस्ते अपघातात विक्रमी 9,951 लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघातांचे मुख्य कारण बेदरकारपणे वाहन चालवणे हे आहे. 2018 मध्ये दोन किशोरवयीन मुलांच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांच्या निषेधामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यूसाठी तुरुंगवासाची शिक्षा जास्तीत जास्त तीन ते पाच वर्षांपर्यंत वाढवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -