घरदेश-विदेशवडील- मुलीची उत्तुंग भरारी, भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील कौतुकास्पद बाब

वडील- मुलीची उत्तुंग भरारी, भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील कौतुकास्पद बाब

Subscribe

फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा हिने एअर कमांडर असलेल्या तिच्या वडिलांसोबत यशस्वी उड्डाण केले आहे. या वडील आणि मुलीने मिळून फायटर जेटचे उड्डाण केले आहे. संपूर्ण देशभरताच या वडील आणि मुलीच्या जोडीची चर्चा सुरु आहे.

भारतीय हवाईदलाच्या(Indian Air Force) इतिहासात पहिल्यांदाच एक अभिमानाची आणि कौतुकाची घटना घडली आहे. वडील आणि मुलीने केलेल्या कामगिरीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा(ananya sharma) हिने एअर कमांडर असलेल्या तिच्या वडिलांसोबत यशस्वी उड्डाण केले आहे. या वडील(sanjay sharma) आणि मुलीने मिळून फायटर जेटचे उड्डाण केले आहे. संपूर्ण देशभरताच या वडील आणि मुलीच्या जोडीची चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा –  युद्धनौका, पाणबुड्यांपासून इतर विभागांमध्येही महिला अग्निवीरांची होणार भरती

- Advertisement -

आणखी वाचा – एअरफोर्समध्ये आता महिला फायटर पायलट होणार परमनंट, संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अनन्या शर्मा ही भारतीय हवाईदलामध्ये(Indian Air Force) फ्लाईंग ऑफिसर आहे. अनन्याने(ananya sharma) जे यश संपादन केलं आहे त्या यशासंदर्भात तिच्या वडिलांना तिचा अभिमान आहे. अनन्या शर्मा आपल्या वडिलांसोबत फ्लाईंग जेट उडवणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे अनन्याच्या कुटुंबासोबतच संपुर्ण देशाला अनन्याचा अभिमान वाटत आहे. या वडील – मुलीच्या जोडीने हवाई दलाचे हॉक – १३२ हे विमान चालवून इतिहासच रचला आहे.

- Advertisement -

आणखी वाचा – हिमाचलमध्ये ढगफुटी! नदी-नाल्यांना पूर, घरे पाण्याखाली, सहाजण बेपत्ता

प्रत्येक मुलींसाठी तिचे वडील हे तिच्या साठी हिरो असतात. अनन्यासाठी(ananya sharma) सुद्धा तिचे बाबा तिच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थाने प्रेरणा स्थान ठरले आहेत. अनन्या लहानपणापासूनच तिच्या वडिलांचं काम पाहत आली आहे. त्यामुळे मोठे झाल्यावरही आपण आपल्या वडिलांच्या म्हणजेच संजय शर्मा(sanjay sharma) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन हवाई दलात रुजू व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून अनन्याने हे यश मिळविण्यासाठी परिश्रम घेतले. २०१६ मध्ये हवाई दलात(Indian Air Force) पहिली महिला फायटर म्हणून देणाऱ्या महिलांकडे पाहून अनन्या शर्माचा आत्मविश्वास अधिकच वाढला. अनन्याने तिचे बीटेक पूर्ण केल्या नंतर तिची भारतीय हवाईदलात फ्लाईंग ब्रांचच्या ट्रेनिंग साठी निवड झाली.

आणखी वाचा –  दिल्लीहून दुबईत जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाची पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, जाणून घ्या कारण?

आणखी वाचा –  Indian Air Force मध्ये नोकरीची संधी; १० वी ते पदवीधर उमेदवारांना करता…

डिसेंबर २०२१ मध्ये फायटर पायलट म्हणून अनन्याची नियुक्ती करण्यात आली. अनन्याचे वडील एअर कमांडर संजय शर्मा यांना १९८९ मध्ये फायटर स्ट्रीम मध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्याच बरोबर संजय शर्मा यांनी मिग २१ स्क्वाड्रनची जबाबदारीही उत्तररित्या सांभाळली. अनन्या शर्मा(ananya sharma) आणि संजय शर्मा(sanjay sharma) या वडील मुलीच्या जोडीने ३० मे २०२२ रोजी हा इतिहास राचला. देशासाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -