धक्कादायक! वडिलांनी मुलीवर आणि प्रियकरावर कुऱ्हाडीने केले सपासप वार!

Crime-Murder

यूपीच्या कानपूरमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरतर प्रत्येक वडिलांना आपली मुलगी खूप प्रिय असते. पण इथे सख्ख्या वडिलांनीच आपल्या मुलीचा जीव घेतला आहे. मुलीच्या वडिलांनी मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यानंतर वडिलांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास करीत आहेत. यात मुलगा जखमी झाला आहे तर मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या दोघांचीही घरं समोरासमोर होती. गेल्या दीड वर्षापासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही एकाच जातीचे आहेत. काल रात्री ही मुलगी संधी मिळताच तिच्या प्रियकराला भेटायला त्याच्या घरी गेली. त्यानंतर प्रियकाराच्या वडिलांनी ही तक्रार मुलीच्या वडिलांकडे जाऊन केली. यानंतर चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी पोटची मुलगी आणि तिच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात मुलीचा जागीत मृत्यू झाला तर मुलगी जबरदस्त जखमी झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसपी दिनेशचंद्र जड पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिनेश चंद्र, एसपी कानपूर देहात यांनी सांगितले की मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीची कुऱ्हाडीने हत्या केली. सध्या मारेकरी वडिलांचा शोध सुरू आहे.


हे ही वाचा – पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने मुलांसमोरच चिरला गळा!