घरताज्या घडामोडीAbdul Qadeer Khan Death: पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादीर खान यांचे निधन

Abdul Qadeer Khan Death: पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादीर खान यांचे निधन

Subscribe

पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक मानले जाणारे अणुशास्त्रज्ञ वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांचे अल्पशः आजाराने आज, रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९३६मध्ये भोपाळमध्ये जन्मलेले आणि १९४७ साली विभाजन झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पाकिस्तानमध्ये गेलेल्या अब्दुल खान यांनी इस्लामाबादच्या खान रिसर्च लॅबोरेटरीज रुग्णालयात आज शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले.

सरकारी असलेल्या असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानच्या माहितीनुसार, अब्दुल खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २६ ऑगस्टला केआरएल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रावलपिंडीमधील एका लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

- Advertisement -

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळे आज तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, फुफ्फुसात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले आणि त्यांना वाचवू शकले नाहीत.

गृहमंत्री शेख रशीद म्हणाले की, ‘त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले.’ तसेच खान यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत राष्ट्रपती आरिफ अल्वी ट्वीट करून म्हणाले की, ‘डॉ. अब्दुल कादिर खान यांच्या निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले आहे. १९८२ पासून वैयक्तिकरित्या ओळखत होतो. त्यांनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी आम्हाला अणुबॉम्ब विकसित करण्यास मदत केली. एक कृतज्ञ राष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – मणिपूर: भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचा केला खात्मा, अजूनही ऑपरेशन सुरू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -