घरताज्या घडामोडीराजकारणात CM पदाची माळ पडलेल्या पिता पुत्राच्या जोड्या, तिघेजण आताही मुख्यमंत्रीपदी

राजकारणात CM पदाची माळ पडलेल्या पिता पुत्राच्या जोड्या, तिघेजण आताही मुख्यमंत्रीपदी

Subscribe

मुख्यमंत्री बनणाऱ्या पिता पुत्रांच्या जोडीत कर्नाटकच्या बोम्मई परिवाराचा समावेश, जाणून घ्या आतापर्यंत मुख्यमंत्री झालेल्या पिता पुत्रांच्या जोड्या

कर्नाटकमध्ये मंगळवारी बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली. उत्तर कर्नाटकचे लिगांयत समाजाचे नेते बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. १९८८ ते १९८९ साली ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. देशातील विविध राज्यात पिता पुत्रांची जोड्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला आहे. राजकारणात CM पदाची माळ पडलेल्या पिता पुत्राच्या जोड्या कोणत्या जाणून घ्या. त्यापैकी काही मुले ही सध्याही मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत. (father son pairs in politics who got opportunity became Chief minister)

एम करुणानिधी आणि एमके स्टॅलिन

- Advertisement -

एमके स्टॅलिन हे सध्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. एमके स्टॅलिन हे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे पुत्र आहेत. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिन यांनी पक्षांची जबाबदारी सांभाळली. त्यांनी मागच्या विधानसभा निवडणूकीत आपल्या पक्षातून चांगल्या मतांनी विजय मिळवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. करुणानिधी यांनी तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. याआधी करूणानिधी १९६९-२१, १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१, २००६-२०११ या कालावधीत त्यांनी तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली.

वायएस राजशेखर रेड्डी आणि वायएस जगनमोहन रेड्डी

- Advertisement -

पिता पुत्र मुख्यमंत्री होणाच्या यादीत आंध्र प्रदेशच्या रेड्डी परिवाराचा समावेश आहे. आंध्रचे सध्याचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी २०१९मध्ये मुख्यमंत्री झाले. याआधी त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी हे २००४ ते २००९ मध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वायएस राजशेखर रेड्डी यांच्यानंतर सहानभूती म्हणून वायएस जगनमोहन रेड्डी यांनी जनतेने मुख्यमंत्री पदावर पसंती दिली.

 

शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन

झारखंडच्या २०१४ विधानसभा निवडणूकीनंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. याआधी त्यांचे वडिल शिबू सोरेन यांनी देखील राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. शिबू सोरेन हे ३ वेळा मुख्यमंत्री झाले होते. २००५मध्ये ते पहिल्यांदा (२मार्च ते १२ मार्च) या १० दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर २००८-२००९ आणि २००९ -२०१० अशी तीन वर्षे ते झारखंडचे मुख्यंत्री होते.

 

बीजू पटनायक आणि नवीन पटनायक

बीजू पटनायक हे दोन वेळा ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी १९६१ – १९६३ आणि १९९५ साली त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र नवीन पटनायक हे सध्या ओडिशा राज्याचे १४ व्या मुख्यमंत्री पदी जबाबदारी सांभाळत आहेत.

 

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी आपल्या प्रभावी कामगिरीने महाराष्ट्राच्या जनतेची मने जिंकणाऱ्या शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. शंकरराव चव्हाण १९७५ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री कारभार सांभाळला होता. तर २००८ ते २०१० मध्ये शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण आदर्श घोटाळा प्रकरणात नाव आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.

 

दोरजी खांडू आणि पेमा खांडू

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांचे वडिल दोरजी खांडू या दोघांनीही मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. दोरडी पांडू यांनी २००७ ते २०११ पर्यंत अरुणाचल राज्यात मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तर पेमा खांडू हे २०१९ पासून अरूणाचलचे मुख्यमंत्री आहेत.

 

पीए संगमा आणि कोनराड संगमा

मुख्यमंत्री पिता पुत्रांच्या जोडीत मेघालय राज्यातील संगमा परिवाराचा समावेश आहे. पीए संगमा हे १९८८ ते १९९० मध्ये मेघालय राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांचे पुत्र कोनराड संगमा हे देखील मेघालयचे मुख्यमंत्री झाले होते.

 

एचडी देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी

बोम्मई परिवाराआधी कर्नाटकमध्ये देवेगौडा पिता पुत्रांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. माजी पंतप्रधान असलेले एचडी देवेगौडा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देखील होते. एचडी देवेगौडा हे १९९६-१९९७ रोजी देशाचे पंतप्रधान होते. तर १९९४-१९९६ला ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.  एचडी कुमारस्वामी यांनी २०१८-२०१९ कालावधीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली.

 

शेख अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला

जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुला हे १९८२ साली मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा फारुक अब्दुल्ला यांनी १९८२-८४ साली जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. अब्दुल्ला परिवारातील तिसरी पिढी देखील मुख्यमंत्री पदीची धुरा सांभाळताना दिसली. फारुक अब्दुल्ला यांच्यानंतर त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांनी देखील जम्मी काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.

मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव

राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या पिता पुत्रांच्या जोडीत उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या जोडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मुलायम सिंह यादव यांनी १९८९-१९९१, १९९३-९६, २००३-२००७ या कालावधीत २ वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. त्यांचा मुलगा अखिलेश यादव हे देखील वयाच्या ३८व्या वर्षी २०१२ ते २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

हेमवती नंदन बहुगुणा आणि विजय बहुगुणा

हेमवती नंदन बहुगुणा आणि विजय बहुगुणा या पिता पुत्रांच्या जोडीने देशातील दोन राज्यात मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली आहे. हेमवती नंदन बहुगुणा हे १९७३ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तर त्यांचे पुत्र विजय बहुगुणा २०१२ ते २०१४ पर्यंत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते.

देवी लाल आणि ओम प्रकाश चौटाला

हरियाणा राज्यात देवी लाल यांनी १९७७-७९, १९८७-१९८९  या कालावधीत मुख्यमंत्री पदाची सूत्र सांभाळली होती. त्यानंतर त्याचे पुत्र ओम प्रकाश चौटाला यांनी १९८९-१९९०, १२जुलै १९९०-१७ जुलै १९९०, २२ मार्च १९९१-६ एप्रिल २००५  या कालावधीत  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.


हेही वाचा – पेगॅसस हत्यार लोकशाही विरोधात का वापरलं? राहुल गांधी मोदी सरकारविरोधात आक्रमक

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -