घरदेश-विदेशएक पोस्ट वडिलांसाठी, गाण्यांमधून साजरा करूया father's day

एक पोस्ट वडिलांसाठी, गाण्यांमधून साजरा करूया father’s day

Subscribe

Happy Fathers Day : मुलांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवणाऱ्या आणि मुलानांच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानणाऱ्या वडिलांना एक थँक्स तर आपण नक्कीच देऊ शकतो.

पडद्यामागचा कलाकार ही भूमिका वडील नेहमीच समर्थपणे साकारतात. ज्याप्रमाणे मदर्स डे साजरा केला जातो त्याच प्रमाणे फादर्स डे (father’s day) सुद्धा साजरा केला जातो. प्रत्येकाची फादर्स डे साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. पण प्रत्येकाच्या मनात आपल्या वडिलांविषयी एकच भावना असते. काही जण प्रेमापोटी तर काहीजण कृतज्ञापूर्वक आपापल्या परीने फादर्स डे साजरा करतात. प्रत्येक जण आपल्या वडिलांना खुश करण्यासाठी त्यांना कार्ड, गिफ्ट्स देतात तर काही जण केक कट करतात. मुलांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवणाऱ्या आणि मुलानांच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानणाऱ्या वडिलांना एक थँक्स तर आपण नक्कीच देऊ शकतो. त्यामुळे या वर्षीच्या फादर्स डे (fathers day) ला तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांना खुश कारण्यासाठी काहीतरी खास करा. फादर्स डे हा दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो त्यामुळे यावर्षीचा फादर्स दे १९ जून २०२२ आहे. फाथर्स डे निमित्त आपण अशाच काही गाण्यांसंदर्भात जाणून घेणार आहोत. जी गाणी वडील आणि मुलीच्या नात्यावर भावनिक भाष्य करतात.

१- दमलेल्या बाबाची कहाणी – (damlelya babachi kahani)

आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. गायक, संगीतकार सलील कुलकर्णी आणि कवी, गीतकार संदीप खरे हि दोन कलाकार मंडळी आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे सदारकर्ते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक गाणं हे उत्तमच आहे पण तरीही दमलेल्या बाबाची कहाणी(damlelya babachi kahani) या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली. बाबा आणि मुलीचं नातं या पाण्यातून खूप अलगद , हळुवार आणि भावनिक पद्धतीने दाखविण्यात आलं आहे.

- Advertisement -

२- दाटून कंठ येतो – (datun kanth yeto)

पंडित वसंत राव देशपांडे यांच्या सुरावटीतून तयार झालेलं गाणं म्हणजे दाटून कंठ येतो. या गाण्याच्या या ओळींप्रमाणे हे गाणं ऐकतानाही खरंच कंठ दाटून येतो. सचिन पळगावकर आणि वंदना पंडित यांची मुख्य भूमिका असलेल्या अष्टविनायक या चित्रपटाची हे भावस्पर्शी गीते. मुलीच्या लग्नाच्या वेळी वडिलांची झालेली हळवी अवस्था आणि वडिलांच्या मुलीच्या लहानपणीच्या आठवणींचा उजाळा या गाण्यामधून देण्यात आला आहे. कोणत्याही लग्न सोहळ्यात हे गाणं आवर्जून लावलं जातं

३- दिलबरो – (dilbaro)

राझी या चित्रपटातलं दिलबरो हे गाणं सुद्धा एका हळव्या क्षणाचं चित्रण करत. मुलीच्या लग्नाचा क्षण आणि तेही एका वेगळ्या देशात देशसेवेसाठी मुलीची पाठवणी करताना वडिलांची होणारी अवस्था ही या गाण्यातून गीतकार गुलझार यांनी उत्तमपणे मांडली आहे.

- Advertisement -

या सगळ्या गाण्यांमधून वडिलांचा एक हलवा कोपरा आणि पडद्यामागचा कलाकार आहे ज्याने सतत स्वतःच्या आधी मुलांचा विचार केला आहे. मातृदिनाला सगळेच आईसाठी पोस्ट करत असतात पण या फादर्स डे ला एक पोस्ट वडिलांसाठी करूया.

आपण हा व्हिडिओ पाहिलात का?

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -