Corona: वर्षभरानंतर कोरोना रुग्णांना थकवा आणि श्वास घेण्याच्या समस्या – संशोधन

fatigue and shortness of breath still afflict many patients a year after their hospitalisation for covid 19 new study report
Corona: वर्षभरानंतर कोरोना रुग्णांना थकवा आणि श्वास घेण्याच्या समस्या - संशोधन

जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनाच्या नव नवीन रुपामुळे (व्हेरियंट) रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमधील कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे, पण अमेरिकेसारख्या देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णांची पुन्हा संख्या वाढताना दिसत आहे. यादरम्यान चिंता वाढवणारा चीनमधील अभ्यास समोर आला आहे. यात कोरोना रुग्णांमध्ये वर्षभरानंतर थकवा आणि श्वसनाचा त्रास उद्भवत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कोरोनामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणाम अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रीयांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही थकवा आणि श्वास घेण्याच्या समस्या अधिक होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नल ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात सांगितले आहे की, कोरोना झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जवळपास निम्मे रुग्ण अजूनही कमीत कमी एक लक्षणामुळे पीडित आहेत. त्यांच्यामध्ये १२ महिन्यांनंतर सर्वात जास्त थकवा आणि स्नायूंमध्ये कमकूवत पणा अशा समस्या दिसून येत आहेत.

लाँग कोविड रुपाचा जीवघेण्या परिस्थितीवर आतापर्यंत सर्वात मोठ्या अभ्यात म्हटले आहे की, डायग्नोसिसच्या एका वर्षानंतर तीन पैकी एक रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचे आढळले आहे. गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये ही संख्या अधिक आहे.

या अभ्यासानुसार चीनच्या वुहान शहरात जानेवारी ते मे २०२० दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सुमारे १ हजार ३०० लोकांचा पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये कमीत कमी एक लक्षण असणाऱ्या रुग्णांचा वाटा हा सहा महिन्यांनंतर ६८ टक्क्यांहून कमी होऊन १२ महिन्यांनंतर ४९ टक्क्यांवर इतका झाला. तर श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांचा वाटा हा सहा महिन्यांनंतर २६ टक्के रुग्णांपासून वाढून तो १२ महिन्यांनंतर ३० टक्के इतका झाला. दरम्यान थकवा आणि स्नायूंचा कमकुवतपणा या समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ४८ टक्के जास्त आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांमधील लक्षणांचा अभ्यास अधिक करण्याची गरज असल्याचे या अभ्यासातून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Fake Covid-19 Test Scam: कुंभमेळा बनावट कोरोना टेस्ट प्रकरणी उत्तराखंडतील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन