Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Fatima Bhutto : फातिमा भुत्तो यांनी विवाहानंतर घेतले शंकराचे दर्शन, सोशल मीडियावर...

Fatima Bhutto : फातिमा भुत्तो यांनी विवाहानंतर घेतले शंकराचे दर्शन, सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

इस्लामाबाद : लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो (Zulfiqar Ali Bhutto) यांची नात फातिमा भुत्तो (Fatima Bhutto) यांनी लग्नानंतर हिंदू मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. फातिमाच्या या कृतीने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांनी तिची स्तुती केली तर काहींनी, ती नेमकी तिथे काय करायला गेली होती? असा सवाल केला आहे.

फातिमा (40) या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांची भाची आणि मुर्तझा भुत्तो यांची मुलगी आहे. आपल्या आजोबांच्या वाचनालयात शुक्रवारी साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. फातिमा आणि तिचा पती ग्रॅहम जिब्रान (Graham Jibran) यांनी रविवारी कराचीतील ऐतिहासिक महादेव मंदिराला (Shiv temple in Karachi) भेट दिली. ते हिंदू सिंधींच्या सन्मानार्थ मंदिरात गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फातिमाचा पती ग्रॅहम ख्रिश्चन धर्मीय आणि अमेरिकन नागरिक आहे.

- Advertisement -

फातिमा रविवारी जेव्हा महादेवल मंदिरात गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत भाऊ झुल्फिकार अली भुट्टो ज्युनियर तसेच हिंदू नेते देखील उपस्थित होते. फातिमा आणि त्यांच्या पतीने महादेवाला दूध अर्पण केले. फातिमा आणि पती ग्रॅहम यांच्या या कृतीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘सिंधी अर्जक’ या ट्वीटर अकाऊंटवर “फोटो पाहून खूप चांगले वाटले,” अशी टिप्पणी करण्यात आली आहे. तर, काही युझर्सनी ‘त्या तिथे काय करायला गेल्या होत्या?’ असा सवाल केला आहे. कुलसूम मुघल नावाच्या युझरने, ‘या विधीचा अर्थ काय,’ असा सवाल आपल्या ट्वीटर अकाऊंटवर केला आहे.

- Advertisement -

भुत्तो परिवार हा पाकिस्तानच्या राजकारणातील एक शक्तीशाली घराणे म्हणून ओळखले जाते. परंतु त्यांचा इतिहास शोकांतिकांनी भरलेला आहे. झुल्फिकार अली भुत्तो यांना तत्कालीन लष्करी हुकूमशहा झिया उल हक यांनी एप्रिल 1979मध्ये लष्करी उठाव करून फाशी दिली होती. झुल्फिकार यांची मोठी मुलगी बेनझीर भुत्तो यांची डिसेंबर 2007मध्ये रावळपिंडीत हत्या झाली होती. सप्टेंबर 1996मध्ये बेनझीर यांचा भाऊ मुर्तझा भुत्तो यांचीही क्लिफ्टनमध्ये हत्या करण्यात आली होती. मुर्तजा यांचा धाकटा भाऊ शाहनवाज भुत्तो 1985मध्ये फ्रान्समधील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले होते.

- Advertisment -