घरCORONA UPDATEचीनच्या टेस्ट किट निघाल्या निकृष्ट दर्जाच्या; युरोपनंतर भारतानेही नाकारल्या

चीनच्या टेस्ट किट निघाल्या निकृष्ट दर्जाच्या; युरोपनंतर भारतानेही नाकारल्या

Subscribe

युरोपनंतर आता भारताने चीनसह अन्य देशांमधून आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किट नाकारल्या आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाच्या या किट्स असल्यामुळे त्या परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

युरोपनंतर आता भारताने चीनसह अन्य देशांमधून आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किट नाकारल्या आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाच्या या किट्स असल्यामुळे त्या परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. युरोपियन देशांनी सुमारे २० लाख किट खराब निघाल्या म्हणून चीनला परत केल्या होत्या. महिनाभरानंतर त्याच किट चीनने भारताला पाठवल्याचे समजते. मात्र भारतानेही त्या परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्याकरता चीनला एकही पैसा देणार नसल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री 

चीनकडून मागवण्यात आलेले किट हे भारतात होत असलेल्या टेस्टसाठी पूरक नाहीत. या किटच्या वापरानंतर अनेक राज्यांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर सरकारने याची गांभीर्याने दखल घेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अशा खराब किटचा वापर करून नागरिकांचे जीव धोक्यात घालणे चुकीचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भारताने आता चीनच्या ज्या कंपन्यांच्या किट खराब निघाल्या म्हणून त्या कंपन्यांवर बंदी घातली, त्या कंपन्यांवर युरोपातील कंपन्यांनी आधीच बंदी घातली होती. त्यामुळे युरोपियन देशांनी २० लाख किट चीनला परत पाठवल्या होत्या. त्याच किट चीनने महिनाभरानंतर भारताला पाठवल्या, असा आरोप होऊ लागला आहे. सुरुवातीला यांचा प्रतिसाद चांगला मिळाला होता. मात्र आता याचा वापर करूनही योग्य निदान होत नसल्याचे समोर आले आहे. चीनच्या वॅन्डॉफ बायोटे आणि लाइव्हझोन डायग्नोस्टिकने आतापर्यंत ४० कोटींच्या ८० लाख किट भारतात पाठवल्या आहेत. वॅन्डॉफ बायोटेकमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त किट आहेत. याच कंपनीने मार्चमध्ये यूके सरकारला २० लाख किट दिल्या होत्या.

हेही वाचा –

CoronaVirus: बोटांना सूज किंवा जळजळ होणे कोरोनाची नवीन लक्षणे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -