Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशराहुल गांधी यांची जोरदार हवा, राजकीय सट्टेबाजांचा हवाला देत आव्हाड यांचा दावा

राहुल गांधी यांची जोरदार हवा, राजकीय सट्टेबाजांचा हवाला देत आव्हाड यांचा दावा

Subscribe

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापाठोपाठ लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या पाच राज्यांमधील निवडणुका सेमीफायनलच ठरणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जोरदार हवा असल्याचे त्यांनी राजकीय सट्टेबाजांचा हवाला देत म्हटले आहे.

हेही वाचा – ओबीसीतून आरक्षण नकोच, वाटल्यास…; मराठा आरक्षणाबाबत भुजबळांनी सुचवला नवा पर्याय

- Advertisement -

मिझोराममध्ये मतदान झाले असून छत्तीसगडमध्ये आता 17 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याच्याबरोबर मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होईल. तर या पाचही राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. यासंदर्भात सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर असेल, असा अनुमान आहे. तर, राजस्थानमध्ये भाजपाची सरशी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील स्थिती काय असेल, याचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील, असे या सट्टेबाजांचे म्हणणे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – राजस्थानमधील जागा वाटपाचा Formula भाजप महाराष्ट्रात वापरणार का? सत्तेसाठी हा आहे X Factor

येत्या काळात या 5 राज्यांतील निवडणुकींचा परिणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जोरदार हवा असून या 5 राज्यांपैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल, असेही या सट्टेबाजांचा अंदाज असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -