घरक्राइमडोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी छापेमारी; FBIकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी छापेमारी; FBIकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही

Subscribe

अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर एफबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषणने (एफबीआय) छापेमारी केली.

अमेरिका : अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर एफबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) ‘मार-ए-लागो’ (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषणने (एफबीआय) छापेमारी केली. या छापेमारीची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिली. मात्र, छापेमारीबाबत एफबीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) ‘मार-ए-लागो’ (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषणने (एफबीआय) छापेमारी केल्याबाबत ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया ‘अ‍ॅप ट्रुथ सोशल नेटवर्क’ यावर (Truth Social Network) यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

“अमेरिकेसाठी काळा दिवस आहे. कारण माझ्या फ्लोरिडा येथील पाम बीचवरील ‘मार-ए-लागो’ या घरी एफबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मी 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीत उभे राहू नये म्हणून मला फसवण्यासाठी ही विरोधकांची खेळी आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. जानेवारी महिन्यात ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्य पार्श्वभूमीवर एफबीआयकडून तपास सुरु असल्याचे समजते. त्यामुळे ट्रम्प आणि ट्रम्प समर्थक तपास यंत्रणाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

याशिवाय, 2020 साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी अनेक सरकारी कागदपत्रसोबत नेले होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत नेले. ही कागदपत्रे फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टमधून हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सध्या 40 टक्क्यांहून कमी जनतेचे समर्थन आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्स काँग्रेसचा पराभव होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रम्प यांनी या कारवाईची तुलना वॉटरगेट घोटाळ्याशी केली आणि अमेरिकेचा भ्रष्टाचार कमी विकसित (तिसऱ्या जगातील) देशांच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचा आरोप केला आहे. ही कारवाई आणि वॉटरगेट यात काय फरक आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वॉटरगेट घोटाळ्यादरम्यान तपास यंत्रणांनी डेमोक्रॅट राष्ट्रीय समितीवर छापे टाकले.

वॉटरगेट घोटाळा

वॉटरगेट घोटाळा हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय घोटाळा आहे. 1972 ते 1974 या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात हे घडले आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला.


हेही वाचा –  गूगलची सेवा डाऊन; सोशल मीडियावर स्क्रीनशॉटचा वर्षाव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -