घरताज्या घडामोडीCorona Vaccine: अमेरिकेत Bharat Biotechच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी नाकारली

Corona Vaccine: अमेरिकेत Bharat Biotechच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी नाकारली

Subscribe

भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यास नकार दिला आहे. एफडीएने लसीसाठी अधिकच्या क्लिनिकल ट्रायल आवश्य असून डाटा पूर्णपणे पाठवणे गरजेचे आहे. जर क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या तर परवानगी मिळू शकते असे अमेरिकेकडून सांगितले आहे. यामुळे भारत बायोटेकला झटका बसला आहे. पण ज्या लसीचा वापर भारतात केला जात आहे, त्या लसीला अमेरिकेन वापरण्यास नकार का दिला आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनविषयी अधिक माहिती मागितली आहे. हैदराबाद स्थित फार्मा कंपनीचे अमेरिकन पार्टनर Ocugen यांनी एका निवेदनात ही माहिती दिली आहे. भारतच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आपल्या पहिल्या तीन टप्प्यांचा डेटा शेअर केला नव्हता. ज्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या वापरास मंजूरी दिली नाही. कारण कंपनीने यावर्षातील मार्चपासून थोडाही टेस्टिंग डाटा दिला नव्हता. एका अधिकृत निवेदनानुसार, एफडीएने Ocugenला जास्त टेस्टिंग डाटा देण्यास सांगितले आहे. अमेरिकन एफडीएने भारत बायोटेकला अजून एक ट्रायल करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ते बायोलॉजिक्स लायसेंस एप्लिकेशन (BLA) अर्ज दाखल करू शकतील.

- Advertisement -

सध्या भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीचे फेज-३ क्लिनिकल ट्रायल करत आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की, याचा जुलैमध्ये डाटा जाहीर करू. ज्यानंतर कंपनी लसीच्या संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल. पण सध्या कोव्हॅक्सिनला परदेशात मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत, कारण जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजूरीसाठी फेज-३चा डाटा पाहिजे.


हेही वाचा – Corona Mutant: धक्कादायक! पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे १०८ म्युटंट!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -