घरदेश-विदेशएफडीएनं पाठवली केरळमध्ये ४० लाखांची औषधं!

एफडीएनं पाठवली केरळमध्ये ४० लाखांची औषधं!

Subscribe

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीकरीता अन्न आणि औषध विभागाने पुन्हा एकदा औषध सामग्री पाठवली आहे.

केरळ राज्यात उद्धभवलेल्या पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून विविध प्रकारे मदत केली जात आहे. या ठिकाणी पुराच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टर व्यक्त करत आहेत. त्यामुळे, साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आता केरळमध्ये अन्न आणि औषध (एफडीए) विभागाकडून औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.

‘यांनी’ही केली मदत

महाराष्ट्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्याच्या अन्न आणि औषध विभागाकडून केरळमध्ये औषधं पाठवण्यात आली आहेत. यामध्ये सलाईन, इंजेक्टेबल्स, कफ सिरप या औषधांचा समावेश आहे. राज्यातील सर्व औषध उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न आणि औषध विभाग, जे. जे. रुग्णालय आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे केरळ राज्याकडे औषधे पाठवण्यात आली आहेत.

- Advertisement -

४० लाख रुपयांच्या औषधांचा पुरवठा

आतापर्यंत देशभरातून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. त्याप्रमाणे अन्न आणि औषध विभागाने देखील ५ लाख औषधे केरळला पाठवली आहेत. एकूण ४० लाख रुपयांची औषधे पाठवण्यात आली आहेत.

केरळला पूरग्रस्त परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. याकरता महाराष्ट्रातील काही डॉक्टर केरळवासियांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर रुग्णांना लागणारा औषधांचा साठा कमी पडू नये याकरता पुन्हा औषधे पाठवण्यात आली आहेत. औषधांअभावी नागरिकांवरील उपचार थांबू नयेत म्हणून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा औषधांचा साठा पाठवला जातोय. महिनाभर पुरेल इतकी औषधे पाठवण्यात आली आहेत. यात अॅन्टिबायोटिक्स औषधं, इंजेक्शन, सलाईन, हृदयविकार, मधुमेहावरील औषधं, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन आणि मलमपट्टीसाठी आवश्यक साधने पाठवण्यात आली आहेत.

गिरीश बापट, अन्न आणि औषध नागरी पुरवठा मंत्री


वाचा – केरळला महाराष्ट्रातून पुन्हा औषधांचा पुरवठा

- Advertisement -

वाचा – केरळ पूरग्रस्तांसाठी विद्यापीठाची मदत

वाचा – मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांची केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -