घरदेश-विदेशचिनूक हेलिकॉप्टरला आग लागण्याच्या भीतीने अमेरिकन सैन्याने उड्डाणे थांबवली, भारताने मागवला अहवाल

चिनूक हेलिकॉप्टरला आग लागण्याच्या भीतीने अमेरिकन सैन्याने उड्डाणे थांबवली, भारताने मागवला अहवाल

Subscribe

अमेरिकन सैन्याने त्यांच्या ताफ्यातील सर्व चिनूक हेलिकॉप्टरच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यांच्या इंजिनमध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अद्याप या चिनूक CH-47 हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील चिनूक हेलिकॉप्टर उड्डाण बंदीबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.

अमेरिकन हवाई दलाच्या निर्णयानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. अहवालानुसार, यूएस आर्मीच्या मटेरियल कमांडने 70 हून अधिक हेलिकॉप्टरची तपासणी करून आपल्या ताफ्याची उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -


लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हेलिकॉप्टरच्या इंजिनला आग लागल्याचे आढळून आले आहे. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडलेले नाही. हे हेलिकॉप्टर सामान्यत: लष्करी उपकरणांच्या वाहतुकीसाठी आणि मदत आणि बचाव कार्यासाठी वापरले जातात. चिनूक हेलिकॉप्टरच्या ग्राउंडिंगमुळे यूएस सैन्यांसाठी वाहतुकीचे आव्हान निर्माण होऊ शकते. मात्र या हेलिकॉप्टर बंदीचा आदेश किती काळ लागू राहतो यावर ते अवलंबून आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की, ग्राउंडिंग ऑर्डर लागू झाली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याच्या ताफ्यात सुमारे 400 हेलिकॉप्टर आहेत. अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, सैनिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. आमची विमाने किंवा हेलिकॉप्टर सुरक्षित राहतील आणि उडता येतील याची आम्ही खात्री करू.

- Advertisement -

सहा दशकांपासून लष्कराला मदत करणारे चिनूक हे हेलिकॉप्टर लष्करासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सैन्याकडून या हेलिकॉप्टरला नियमित आणि विशेष प्रसंगी वापर केला जातो, हे हेलिकॉप्टर चार डझनहून अधिक सैनिक किंवा माल वाहून नेऊ शकते. गेली सहा दशके ते लष्कराचे मोठे सहाय्यक राहिले आहे. हे एरोस्पेस कंपनी बोईंगने बनवले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -