घरदेश-विदेशकुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ताचा मृत्यू, ५ वर्षांच्या साशाला नामिबियातून आणलं होतं...

कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ताचा मृत्यू, ५ वर्षांच्या साशाला नामिबियातून आणलं होतं…

Subscribe

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियाहून श्योपूरच्या कुनो येथे आठ चित्ते आणले होते.

मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमधून मोठी बातमी समोर येत आहे. नामिबियातून आणलेल्या मादी चित्ताचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांची साशा ही किडनीच्या आजाराने त्रस्त होती. गेल्या २२ जानेवारी रोजी तिला किडनीच्या आजाराने ग्रासल्याचे सांगण्यात आले होते. भारतात येण्याआधीच तिला किडनीच्या आजाराने ग्रासले होते. नामिबियात तिच्यावर ऑपरेशन देखील करण्यात आलं होतं. पण हे सत्य लपवण्यात आलं होतं.

कुनो नॅशनल पार्कच्या मोठ्या आवारात सवाना आणि सिया या दोन मादी चित्तांसोबत कम्पार्टमेंट क्रमांक ५ मध्ये मादी चित्ता साशा राहत होती. २२ जानेवारी रोजी ती आजारी पडली. यानंतर तिला मोठ्या वास्तूतून छोट्या वाड्यात हलवण्यात आलं. साशा जेवणही खात नव्हती आणि सुस्त पडून राहत होती. यानंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये उपस्थित तीन डॉक्टर आणि भोपाळहून पोहोचलेल्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा मादी चित्ताच्या किडनीमध्ये इन्फेक्शन आढळून आले.

- Advertisement -

8 चित्ते भारतात आणले होते
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियाहून श्योपूरच्या कुनो येथे आठ चित्ते आणले होते. यातील ५ मादी तर ३ नर चित्ते होते. सर्व ८ चित्ते त्यांचं नवं घर कुनोमध्ये गेल्या चार महिन्यांपासून जगू लागले होते. सर्व चित्ते इथे आल्यापासून पूर्णपणे तंदुरुस्त झाले होते आणि शिकार देखील करत होते. दरम्यान, २२ जानेवारीला यातील एक मादी चित्ता साशा आजारी पडली. तिच्यावर सर्वात मोठे चित्ता तज्ञ डॉ. एड्रियन टॉर्डिफ हे उपचार करत होते. अखेर साशा या मादी चित्ताला जास्त काळ जगवता आलं नाही आणि तिने जगाचा निरोप घेतला.

हे ही वाचा : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; मोबाईलही बंद

- Advertisement -

Sasha Kidney Disease

भारतात येण्यापूर्वी साशा आजारी होती
साशाला मूत्रपिंडाचा आजार झाल्याचं सांगण्यात आलं. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडून आणि कुनो नॅशनल पार्क व्यवस्थापनाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी नामिबियातील चित्ता संरक्षण प्रतिष्ठानकडून साशावरील आधीच्या उपचाराचा इतिहास मिळवला. १५ ऑगस्ट २०२२ रोजी नामिबियामध्ये केलेल्या शेवटच्या रक्ताच्या नमुन्याच्या चाचणीत क्रिएटिनिनची पातळी ४०० प्रति पेक्षा जास्त होती, हे लक्षात आलं. यावरून भारतात येण्यापूर्वीच साशाला किडनीचा आजार होता, हे स्पष्ट झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -