Covid-19 : यावेळी कोरोना देतोय डोक्याला कमी ताप, सीटी स्कॅनमधून झाला खुलासा

मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तिसऱ्या लाटेत दोन ते तीन दिवस ताप येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर बहुतांश कोरोनाबाधित लोकांच्या छातीचे सीटी स्कॅन रिपोर्टही नॉर्मल येत आहेत.

fever duration shorter in omicron wave ct scan showing normal results in most covid patients say experts
यावेळी corona देतोय डोक्याला कमी ताप, सिटी स्कॅन मधून झाला खुलासा

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालाय. यात भारतात आज 7 महिन्यांनंतर कोरोनाचे जवळपास 1 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता काही काळापूर्ती सौम्य ताप येणे असे लक्षण दिसून येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना सुमारे आठवडाभरा ताप येत होता. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तिसऱ्या लाटेत दोन ते तीन दिवस ताप येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर बहुतांश कोरोनाबाधित लोकांच्या छातीचे सीटी स्कॅन रिपोर्टही नॉर्मल येत आहेत.

डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये फरक काय?

Covid-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, सध्याच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि डेल्टा व्हेरिएंटमध्ये फरक हा आहे की, आत्ताच्या बहुतांश नव्या रुगणांना कमी कालावधीसाठी ताप येतोय. तर हा संसर्ग श्वसनमार्गाच्या वरच्या भागात आढळतोय. त्यामुळे छातीपर्यंत हा संसर्ग पोहचत नाही. त्यामुळे तापाचे लक्षण ७२ तास राहते आणि नंतर कमी होते. मात्र डेल्टा व्हेरिएंट संसर्गात ताप बराच वेळ राहत होता.

Corona: कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर ‘या’ सहा गोष्टी जरूर करा

डॉ. जोशी पुढे म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे दोन ते पाच दिवस टिकतात. यात घसा खवखवणे, जळजळ, खाज सुटणे, ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, नाक वाहणे, चक्कर येणे, स्नायू दुखी, सतत थकवा यांचा समावेश आहे.

यावर डॉ.कपिल जिरपे म्हणाले की, सध्याच्या लाटेत 99 – 100 फॅरेनहाइटच्या आसपास सौम्य ताप येत आहे. हा ताप दोन ते तीन दिवसांत जातो.

coronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे

बहुतेक सीटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल

महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य आणि सल्लागार डॉ. वसंत नागवेकर म्हणाले की, ‘कोरोनाची सौम्य असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र सीटी स्कॅन केलेले 90 – 95 रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. डेल्टा संसर्गादरम्यान मध्यम आणि गंभीर रुग्णांचे सीटी स्कॅन असामान्य होते.

डॉ. नागवेकर म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येतेय. तर तापाचे लक्षण 47- 72 तास राहतेय. मात्र नागवेकर यांच्या रुग्णालयात सध्या एकही कोविड रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर नाही.


Jawed Habib Video : जावेद हबीबने डोक्यावर थुंकून कापले महिलेचे केस! नंतर दिले असे स्पष्टीकरण