जास्त मद्यपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका

जास्त दारुचे सेवन करणे करणाऱ्यांना कोरोनाचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असतो.

fi you drink too much the immunity system will be affected badly?
मद्यपान

देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. मात्र, असे असताना देखील राज्यातील काही भागात सोमवार पासून दारू विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर राज्यातील दारूच्या दुकानांवर तळीरामांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तर दोन दिवसात राज्यात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांची दारू खरेदी देखील केली गेली. मात्र, जास्त दारुचे सेवन करणे जीवाला धोका असून डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे जास्त दारुचे सेवन करणाऱ्यांना कोरोनाचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक आहे. कारण दारुमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका इतर व्यक्तीपेक्षा अधिक असतो.

कोरोनापासून बरं होण्यासाठी अधिक वेळ

वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ‘दारुतील अल्कोहल घशाखाली येताच ते शरीरातील प्रथिने आणि पेशींपर्यंत जाऊन पोहचते. तसेच दारुत असलेल्या विषारी रसायनामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि रोगाचा प्रसार अधिक वेगाने होतो.

अल्कोहोलचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. त्याचप्रमाणे नियमित आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणार्‍यांना लिवरची समस्या निर्माण होते. – डॉ. प्रवीण शाह

अल्कोहोलचा लिवरवर थेट परिणाम होतो. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने त्याचा परिणाम फुफ्फुस आणि श्वसनावर देखील होतो. विशेष म्हणजे टीबीच्या रुग्णांना अधिक धोका असतो. अकादमी ऑफ मेडिकल सायन्सने केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे सामान्य माणसांच्या तुलनेपेक्षा मद्य सेवन करणाऱ्या लोकांना बरे होण्यासाठी ४५ टक्के अधिक वेळ लागतो. – डॉ. एमसी गर्ग, सीएमओ


हेही वाचा – राज्यात दोन दिवसांत १६ लाख लिटर्स दारूची विक्री, ६२ कोटींची कमाई