घरक्रीडाFIFA 2026 : फिफाकडून 2026 विश्वचषकाची घोषणा, पहिल्यादांच 48 संघ होणार सहभागी

FIFA 2026 : फिफाकडून 2026 विश्वचषकाची घोषणा, पहिल्यादांच 48 संघ होणार सहभागी

Subscribe

नवी दिल्ली : फिफीकडून २०२६ विश्वचषकाची मंगळवारी (१४ मार्च) घोषणा करण्यात आली आहे. २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच ४८ संघ सहभाग घेणार असून या संघांमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत.

फिफा विश्वचषकात याआधी 64 सामने खेळवले जात होते, परंतु २०२६ साठी फिफाचे स्वरूप वाढविण्यात आले आहे.
फिफा २०२६ विश्वचषक स्पर्धेचे युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको हे देश संयुक्तपणे आयोजन करणार आहेत. फिफाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले की, अनेक पैलू विचारात घेऊन फिफा परिषदेने 2026 च्या आवृत्तीसाठी चार संघांचे 12 गट तयार करण्याचा सुधारित प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. यापूर्वी स्पर्धेत तीन संघांचे 16 गट तयार करण्यात आले होते. फिफाने सुधारीत केलेल्या प्रस्तावानुसार अव्वल दोन संघ आणि आठ सर्वोत्कृष्ट तिसर्‍या क्रमांकाचे संघ 32 च्या फेरीत प्रवेश करतील.

- Advertisement -

फिफा विश्वचषकाचे स्वरूप बदलले
फिफाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “खेळातील अतुलनीयता, खेळाडूंचे कल्याण, सांघिक प्रवास, व्यावसायिक, क्रीडा आकर्षण, संघ आणि चाहत्यांच्या अनुभवाच्या आधारे फिफा परिषदेने एकमताने सुधारित प्रस्ताव मंजूर केला आहे. या सुधारित प्रस्तावानुसार फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेत ३ संघांच्या 16 गटांऐवजी ४ संघांचे 12 गट असतील. अव्वल दोन संघ आणि आठ सर्वोत्कृष्ट तिसर्‍या क्रमांकाचे संघ 32 च्या फेरीत प्रवेश करतील.
“बदललेल्या फॉर्मेटमध्ये संगनमताचा धोका दूर करण्यात आला आहे आणि संघांना किमान तीन सामने खेळायला मिळतील याची खात्री करण्यात आली आहे.” प्रतिस्पर्धी संघांमधील विश्रांतीचा वेळ संतुलित ठेवण्याकडेही लक्ष दिले गेले असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

आतापर्यंत विश्वचषकात काय घडले
गेल्या वर्षी कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 32 संघांनी भाग घेतला होता आणि 29 दिवसांत एकूण 64 सामने खेळले गेले होते. अमेरिका आणि मेक्सिकोने गेल्यावर्षी फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत केवळ 24 संघ सहभागी झाले होते. मात्र १९९८ च्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच ३२ संघ विश्वचषकात सहभागी होत आहेत. याआधी चार संघांचे आठ गट तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये अंतिम स्पर्धक एकूण सात सामने खेळत होते. मात्र, 2026 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीतील संघांना एकूण आठ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -