कतारमधील लुसैल शहरातील वर्ल्डकप स्टेडियमवर भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

कतारमधील लुसैल शहरातील वर्ल्डकप सिटीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कतारने फिफा वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी पायाभूत सोयी आणि सुविधांवर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. तरी देखील आगीसारखी घटना घडली.

कतारमधील लुसैल शहरातील वर्ल्डकप सिटीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कतारने फिफा वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी पायाभूत सोयी आणि सुविधांवर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. तरी देखील आगीसारखी घटना घडली. या घटनेमुळे कतारमधील वर्ल्डकप करीता करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या आगीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिलेजमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या एका इमारतीमध्ये आग लागली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सिव्हिल डिफेन्सने ही आग नियंत्रणात आणली.

या आगीत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, कतारने फिफा वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी पायाभूत सोयी आणि सुविधांवर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. तरी देखील आगीसारखी घटना घडली.

या आगीबाबत कतारच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, लुसैलच्या आईसलँडमधील या भागात संध्याकाळी आग लागली. या शहरातच फिफाचे अनेक सामने होणार आहेत. यात शनिवारी रात्री होणाऱ्या अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सिको या हाय व्होल्टेज सामन्याचा देखील समावेश आहे. ही आग लुसैल स्टेडियमपासून 3.5 किलोमीटर अंतरावर लागली. आग लागल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट उठरले होते.


हेही वाचा – …तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आवाहन