घरक्रीडाFifa World cup: कतारमध्ये अमेरिकन क्रीडा पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

Fifa World cup: कतारमध्ये अमेरिकन क्रीडा पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

सध्या कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्व कप फुटबॉल २०२२ सामन्यादरम्यान अमेरिकेचे क्रिडा पत्रकार ग्रॅण्ट वाहल यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

सध्या कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्व कप फुटबॉल २०२२ सामन्यादरम्यान अमेरिकेचे क्रीडा पत्रकार ग्रॅण्ट वाहल यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अर्जेंटिना आणि नेदरलँडमध्ये फुटबॉल सामना सुरू असताना वाहल अचानक खुर्चीवरून खाली पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहल यांची फुटबॉल विश्वकप कव्हर करण्याची ही ८ वी वेळ होती. दरम्यान, वाहल यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कतारमध्येच नाही तर अमेरिकेतही खळबळ उडाली असून वाहल यांच्या कुटुंबाने कतार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, वाहल यांचा मृत्यू होण्याच्या एक दिवसाआधीच कतार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. LGBTQ चे समर्थन करणारा संदेश छापलेले शर्ट वाहल यांनी घातल्याने कतार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना स्टेडियममधून बाहेर हाकलण्यात आले.

- Advertisement -

कतारमध्ये समलैंगिक संबंधाना मान्यता नाही. याचपार्श्वभूमीवर कतार पोलिसांनी वाहल यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हापासून वाहल अस्वस्थ होते.

- Advertisement -

कतारमध्ये फिफा विश्व कप फुटबॉल २०२२ चे आयोजन झाल्यापासूनच गोंधळ सुरू होता. विश्वकप सामने बघण्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी कतार सरकारने नियमावलीच जारी केली होती. यात कतारमध्ये येणाऱ्यांसाठी सेक्स, कुटुंबनियोजन सामग्री, मदय सेवन,समलैंगिक संबंध, महिलांच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या पोषाखावरही बंदी घालण्यात आली होती. यामुळे कतारमधील फुटबॉल सामन्यांपेक्षा सरकारच्या या नियमावलीचीच जगभऱात चर्चा होती. कतार हे इस्लामिक राष्ट्र असल्याने येथील कायदे आणि नियमांचे पालन परदेशी व्यक्तींनीही करणे कतार सरकारला अपेक्षित होते. यामुळेच LGBTQ वर कतार सरकारने कडक नियम लागू केले. ज्याला जगभऱातून विरोध दर्शवण्यात आला. पण तरीही कतार मात्र आपल्या नियमांवर ठाम होते.

मात्र कतार सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी वाहल यांनी समलैंगिक संबंधाचे समर्थन करणारा संदेश असलेले शर्ट घातले. यामुळे त्यांच्यावर सरकारविरोधात कारवाई केल्याचा आरोप लावण्यात आला होता. वाहल यांच्या भावानेही ग्रॅण्ट हे  सुदृढ होते. त्यामुळे त्यांच्या या अकस्मिक मृत्यूमागे काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -