घरदेश-विदेश'भारत जोडो यात्रा'च्या तोंडावरच काँग्रेसचे युट्यूब चॅनल डिलीट; पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न

‘भारत जोडो यात्रा’च्या तोंडावरच काँग्रेसचे युट्यूब चॅनल डिलीट; पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न

Subscribe

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ची घोषणा केली. पण या यात्रेला जेमतेम पंधरा दिवस राहिले असताना बुधवारी काँग्रेसचे युट्यूब चॅनलच डिलीट झाले आहे. काँग्रेसनेच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ होणार आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. या यात्रेत काँग्रेस पक्षाचा झेंडा पाहायला मिळणार नाही. काँग्रेस नेत्यांच्या हाती तिरंगा असेल.

या यात्रेत तीन प्रकारचे यात्री असतील. त्यात 100 ‘भारत यात्री’ असतील, जे सुरुवातीपासून समारोपापर्यंत म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी असतील. तर, ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार नाही, त्या राज्यातील 100 यात्री असतील आणि ते ‘पाहुणे यात्री’ असतील. तर, ज्या राज्यांतून ही यात्रा जाईल, तेथील 100 ‘प्रदेश यात्री’ असतील. अशा प्रकारे जवळपास पाच महिने या यात्रेत कायम 300 यात्री असतील.

- Advertisement -

समाजासमाजामधील विद्वेषाचे वातावरण संपविण्याच्या उद्देशाने ही भारत जोडो यात्रा काढण्यात येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. एकूण 150 दिवस आणि 3500 किलोमीटर ही यात्रा चालेल. ‘एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए तो जुड़ जाए अपना वतन’ असे सांगत ‘मिले कदम, जुडे वतन’ असे घोषवाक्य काँग्रेसने दिले आहे. तसेच सर्व काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावरील आपले फोटो बदलून या यात्रेचा लोगो ठेवला आहे.

एकीकडे अशी जोरदार तयारी सुरू असतानाच काँग्रेसकडून पक्षाचे युट्यूब चॅनलच डिलीट झाले आहे. ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ हे आमचे युट्यूब चॅनल डिलीट करण्यात आले. हे पूर्ववत करत करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आम्ही गूगल तसेच युट्यूबच्या टीमबरोबर सातत्याने संपर्क साधत आहोत, असे काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -