Eco friendly bappa Competition
घर क्राइम पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणातील पाचव्या शूटरसह 2 साथीदारांना अटक

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणातील पाचव्या शूटरसह 2 साथीदारांना अटक

Subscribe

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अधिक तापास केला असता सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून सुरूवातीला देण्यात आली होती.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अधिक तापास केला असता सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून सुरूवातीला देण्यात आली होती. यापैकी आता पाचव्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच ट्विट करून दिली आहे. (Fifth Shooter Arrested in Punjab Singer Sidhu Moose Wala Murder Case)

डीजीपी, पंजाब पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. “पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील फरार शूटर दीपक मुंडीला दोन साथीदारांसह अटक केली”, असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री यांनी याप्रकरणातील तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, दीपक, कपिल पंडित आणि राजिंदर यांना आज एजीटीएफ टीमने पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवर गुप्तचर कारवाईत अटक केली. दीपक बोलेरो मोड्यूलमध्ये शूटर होता. त्याच वेळी कपिल पंडित आणि राजिंदर यांनी शस्त्रे आणि ठावठिकाणासहित रसद पुरवली होती, असे पंजाब पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिहार जेलमधून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या हत्येप्रकरणी सुरूवातीला संतोष जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांची नावे समोर आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू करत संतोष जाधवचा शोध सुरू केला. दरम्यान त्यावेळी पोलिसांनी सिद्धेश कांबळेला पोलिसांनी अटक केली होती. सिद्धेश हा सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य होता. सिद्धेश कांबळेला संगमनेर जवळून अटक करण्यात आले होते. आता संतोष जाधवलाही पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

29 मे रोजी हत्या

सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. जीपमधून जात असताना रस्त्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर लॉरेन्स यांनीही सुद्धूच्या हत्येची कबुली दिली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्हीआयपी सुरक्षा काढून घेतल्यानंतर 48 तासांच्या आतच सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये व्हीआयपींना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -