उत्तरप्रदेश : निवडणूक म्हटले की, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे कार्यकर्ते. कार्यकर्त्यांना प्रचाराला बोलवायचे म्हणजे त्यांच्या सर्व व्यवस्थेची काळजी घ्यावी लागते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील उमेदवारांना करावी लागते. मात्र प्रत्येक वेळेस या कार्यकर्त्यांच्या मागण्या नेत्यांना पूर्ण करता येतीलचं असे नाही. तसेच या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे किंवा त्यांनी वाद घालण्याचे कारण काहीही असू शकते. असाच काहीसा प्रकार एका भाजपा खासदाराने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये घडल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये झालेला हाणामारीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Clashes at a BJP office in Uttar Pradesh.)
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरचे खासदार विनोद बिंद यांनी मेजवानची आयोजन केले होते. 14 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेजवानीमध्ये हजारो लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी जेवायला आलेल्या कार्यकर्त्यांना जेवण वाढताना मटणाचे खडे काही मिळाले नाहीत. फक्त रस्साच वाढण्यात आला. त्यामुळे मटणाचा तुकडा न मिळाल्याने अनेकांनी जाब विचारला. मात्र त्यावर उलट उत्तर मिळाल्याने आधी शाब्दिक वाद सुरु झाला आणि त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. खासदाराच्या भावाने मटणाचे तुकडे कुठे आहेत? या प्रश्नाकडे दूर्लक्ष करत रस्सा वाढणे सुरु ठेवल्याने पाहुणे अधिक संतापल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : Raj Thackrey : पक्ष मेले तरी चालतील पण… काय म्हणाले राज ठाकरे?
यानंतर आयोजक खासदाराचे समर्थक आणि पाहुणे यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. मटणाचे तुकडे का वाढले नाही यावरुन अनेकजण एकमेकांवर धावून गेले. एकमेकांना बेदम मारहाण केली. या हाणामारीनंतरचे कार्यक्रम स्थळावरील व्हिडीओ आता समोर आले आहेत. कछवा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या करसडा येथे विनोद बिंद यांचे कार्यालय आहे. या पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Edited By Komal Pawar Govalkar