घरट्रेंडिंगधक्कादायक! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!

धक्कादायक! कोंबड्यानं केला पोलिसाचा मर्डर, गावकरी हैराण!

Subscribe

फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला 'तुपडा' असे म्हटले जाते.

नॉन-व्हेज पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो कोंबड्याचे मांस वापरले जाते त्यासाठी कोंबड्याचा जीव घेतला जातो. मात्र तुम्ही कधी कोणत्या कोंबड्यानं जीव घेतल्याचे ऐकले आहे का? नाही ना..पण हे सत्य आहे. फिलिपिन्समध्ये एका कोंबड्यानं चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्व गावकरी देखील हैराण झाले आहे. कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढाईत छापा टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कोंबड्यानं हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

कोबड्यांच्या लढाईत सामिल असलेल्या या फायटर कोंबड्याच्या पायावर ब्लेड होते. पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर त्याचीच ब्लेडनं रक्तवाहिनी (Artery) कापली गेली. यामुळे पोलीस अधिकारी लेफ्टनंट क्रिस्टिचन बोलोक यांचा मृत्यू झाला. बोलोक हा कोंबड्यांच्या बेकायदेशीर खेळाविषयी पुरावे गोळा करण्यासाठी तेथे गेला होता, अशी माहिती मिळतेय.

- Advertisement -

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोंबडीच्या पायाच्या धारदार ब्लेडनं क्रिस्टिचन बोलोकच्या डाव्या मांडीच्या धमनीत अडकले आणि कापले गेले. यामुळे पोलिस कर्मचार्‍याच्या पायातून बरेच रक्त गेले. तसेच फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला ‘तुपडा’ म्हणतात आणि ते खूप लोकप्रिय आहे. लोक त्यावर पैसे खर्च करतात आणि ते जुगार म्हणून प्रसिद्ध आहे, असे पोलिसांचे प्रमुख कर्नल आर्नेल आपुद यांनी सांगितले.

फिलिपिन्समध्ये कोंबडीच्या लढाईला ‘तुपडा’ असे म्हटले जाते. या लढाईत कोंबड्यांच्या पायावर ब्लेड लावले जाते. लढाईसाठी कोंबड्यांच्या पायात ब्लेड ठेवले जाते, ज्याला गॅफ म्हणतात. दरम्यान कोरोनामुळे अशा खेळांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या लोकांना पकडण्यासाठी गेलेल्या बोलोक यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.


‘तुझ करिअर कसं होतं तेच बघतो..’‘Bigg Boss’ स्पर्धकाला मनसेचा इशारा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -