घरदेश-विदेशठरलं! ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार

ठरलं! ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार

Subscribe

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीला अखेर मुहूर्त सापडला असून १२ जुनला सिंगापूर येथे ही भेट होणार आहे.व्हाईट हाऊसकडून तशी घोषणा करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.शाब्दिक हल्ले चढवत युद्धाची धमकी दिल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली होती.त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण आहे.

जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना सिंगापूर इथे घडणार आहे. होय नाही म्हणता म्हणता अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सिंगापूरला १२ जूनला स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव सारा सँडर्स यांनी केली आहे. दोन्ही नेत्यांची भेट ही जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. भेटीची जोरदार तयारी सध्या सिंगापूरला होत असून, दोन्ही नेते पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार आहेत.

जगातिक राजकारणात मैत्रिचे नवे पर्व?

अमेरिका आणि उत्तर कोरियाचे वैर सर्वश्रृत आहे. अण्वस्त्र चाचण्याकरत उत्तर कोरियाने थेट अमेरिकेला आव्हान दिल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. शिवाय दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिकहल्ले देखील चढवले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला होता.या सर्व घडामोडी पाहता डोनाल्ड ट्र्म्प आणि किम जोंग उन यांची भेट महत्नाची आहे. दोन्ही नेत्यांनी भेट घ्यावी यासाठी मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांचे राजनैतिक अधिकारी प्रयत्नशील होते.पण, व्हाईट हाऊसकडून त्याला थंड प्रतिसाद मिळत होता. शिवाय ट्रम्प यांनी देखील भेट नाकारली होती. पण, अखेर ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीला मुहूर्त सापडला आहे. या भेटीतून काय फलित निघणार याकडे आता साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.या भेटीतून सकारात्मक गोष्टी हाती लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या भेटीसाठी किम जोंग उन यांच्या हॉटेलचा खर्च हा सिंगापूर सरकार उचलणार असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे. उत्तर कोरिया सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे.त्यामुळे हा निर्णय झाल्याचे कळतंय.

- Advertisement -

जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांची भेट जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अण्वस्त्र चाचण्याकरत उत्तरल कोरियाने संपूर्ण जगाला वेठीला धरले होते.जपानवरून क्षेपणास्त्राची चाचणी करत थेट अमेरिकेलाच आव्हान दिले होते.त्यामुळे ही भेट जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.यापूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये देखील समझोता झाला आहे.दोन्ही नेत्यांची भेट यशस्वी झाली तर जागतिक राजकारणात मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल हे मात्र नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -