घरअर्थजगतसरकारची मोठी घोषणा; गृह प्रकल्पांवरील GST घटला!

सरकारची मोठी घोषणा; गृह प्रकल्पांवरील GST घटला!

Subscribe

निवडणुकांच्या २ महिने आधी सरकारने सामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. गृह प्रकल्पांसाठीचे जीएसटी दर सरकारने कमी केले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नवीन घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. घोषणेनुसार सरकारी योजनांमधील सवलतीच्या घरांवरचा जीएसटी ८ टक्क्यांवरून थेट १ टक्क्यावर आणण्यात आला आहे. यामध्ये म्हाडा, सिडको, एसआरए अशा घरबांधणी योजनांचा समावेश आहे. त्यामुळे अशा ठिकाणी घरं घेणाऱ्या सामान्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. याशिवाय इतर बांधकामाधीन घरांवरील (अंडर कन्स्ट्रक्शन) जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे यातून सामान्य घर खरेदीदाराला देखील मोठा दिलासा मिळाला आहे. जनसामान्यांना या घोषणांचा कितपत फायदा होईल, हे जरी अद्याप अनिश्चित असलं, तरी भाजपला निवडणुकांमध्ये या घोषणांचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे.

- Advertisement -

१ एप्रिलपासून नवे जीएसटी दर लागू

दरम्यान, नवी जीएसटी प्रणाली लगेच लागू न होता येत्या १ एप्रिलपासून म्हणजेच पुढच्या आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यामुळे यादरम्यान जी घरं आधीच्या जीएसटी नियमावलीप्रमाणे बनवली जात आहेत, त्या घरांसाठी किंवा बांधकाम प्रकल्पांसाठी नवे नियम बनवावे लागतील, असंही जेटली यावेळी म्हणाले. जुन्या नियमावलीमधून नव्या नियमावलीमध्ये या सर्व प्रकल्पांचं स्थलांतर (ट्रान्सफर) करण्यासाठी ही नियमावली तयार केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -