अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ब्लॉक स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बांधणार

आरोग्य क्षेत्रात सरकारी खर्च वाढवला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

nirmala sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील घोषणांच्या वेळी आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा केली. गाव पातळीवर आरोग्य क्षेत्राचा विकास करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहेत.

सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्ग ब्लॉक होईल आणि ब्लॉक स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बांधण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. अर्थमंत्री म्हणाल्या की जिल्हा पातळीवरील रुग्णालयांवर ब्लॉक स्वावलंबी राहतील. लॅब नेटवर्क मजबूत केलं जाईल. तसंच आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रांना बढती दिली जाईल.


हेही वाचा – रोजगार निर्माण करण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद


अर्थमंत्री म्हणाल्या की अशी रचना आरोग्याच्या क्षेत्रात निर्माण व्हायला हवी, ज्यामुळे आरोग्या क्षेत्रामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजेत, परंतु त्याचबरोबर साथीच्या रोगामध्ये लढा देण्याची क्षमतादेखील असायला हवी. यासाठी आरोग्य क्षेत्रात सरकारी खर्च वाढविला जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.